महाबळेश्वर: ITIच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाचगणी: महाबळेश्वरच्या नजीक असणाऱ्या पाचगणी उंब्रज येथे आयटीआय परीक्षेला जाणाऱ्या दोन तरुणांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषिकेश चंद्रकांत गोळे (वय 21) या युवकाचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला अविनाश गोळे (वय 20) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. हे दोन्ही युवक महाबळेश्वर तालुक्यातील गोळेवाळी येथील आहेत.

ADVERTISEMENT

दुचाकीचा हा अपघात एवढा गंभीर होता की, ज्यामध्ये ऋषिकेश गोळे हा युवक जागीच ठार झाला तर करहर, तालुका जावळी येथील अविनाश गोळे हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

जखमी अविनाशवर सध्या सातारा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यासंदर्भात घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काल (9 जानेवारी) सकाळी आठच्या सुमारास उंब्रज येथे आयटीआय परीक्षेला दुचाकीवरून जाताना वळसे गावाजवळ महामार्गावरील अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने ऋषिकेश गोळे याच्या डोक्याला जोरदार फटका बसल्याने त्याचा जागीच मृत्य झाला.

हे वाचलं का?

तर त्याच्यामागे दुचाकीवर बसलेला अविनाश गोळे याच्या डोक्याला गंभीर स्वरुपात मार लागल्याने तो जागीच बेशुद्ध झाला होता. त्याला तशाच अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारांसाठी त्याला सातारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

ऋषिकेश चंद्रकांत गोळे याचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गोळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. ऋषिकेश हा पाचगणी येथील गोडोली औद्योगिक प्रशिक्षण केंद्र संस्था येथे आयटीआयचे शिक्षण घेत होता. त्याची परीक्षा उंब्रज येथे होती. त्याच्या बरोबरच आयटीआयचे शिक्षण घेणारा अविनाश गोळे देखील परीक्षेला जात होता. मात्र, दुर्दैवाने अपघातात तो देखील जखमी झाला.

ADVERTISEMENT

बीड: एसटी बसचा चक्काचूर.. बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू

ADVERTISEMENT

या अपघाताची नोंद महामार्गावरील बोरगाव या पोलीस स्थानकामध्ये झाली असून अधिक तपास बोरगावचे पोलीस करत आहेत.

दरम्यान, या महामार्गावर आतापर्यंत अनेकदा अपघात होऊन काही जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मात्र, अद्यापही प्रशासन याबाबत फारसं जागरुक झालेलं नाही. त्यामुळे आता या घटनेनंतर तरी प्रशासन या सगळ्या महामार्गाबाबत काही निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT