हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद पेटला! नाशिकच्या शास्त्रार्थ सभेत महंतांचा राडा
हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद चांगलाच पेटला आहे. नाशिकमध्ये हनुमानाचं जन्मस्थळ कोणतं यावरून शास्त्रार्थ सभा बोलवण्यात आली होती. मात्र या सभेत महंतच आपसात भिडले असल्याचं दिसून आलं. या शास्त्रार्थ सभेत किष्किंधातील मठाधिपती गोविंदानंद यांनी केलेल्या दाव्यावरून ही चर्चा आयोजित करण्यात आली होती. गोविंदानंद यांनी वाल्मिकी रामायणाचा हवाला देत किष्किंधा हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर […]
ADVERTISEMENT
हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद चांगलाच पेटला आहे. नाशिकमध्ये हनुमानाचं जन्मस्थळ कोणतं यावरून शास्त्रार्थ सभा बोलवण्यात आली होती. मात्र या सभेत महंतच आपसात भिडले असल्याचं दिसून आलं. या शास्त्रार्थ सभेत किष्किंधातील मठाधिपती गोविंदानंद यांनी केलेल्या दाव्यावरून ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
गोविंदानंद यांनी वाल्मिकी रामायणाचा हवाला देत किष्किंधा हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर नाशिकमधले महंत, साधू आणि पुजारी आक्रमक झाले होते. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरजवळ असलेला अंजनेरी पर्वत हेच हनुमानाचं जन्मस्थान आहे असा दावा या सगळ्यांनी केला आहे. यातलं नेमकं सत्य काय? यावर चर्चा करण्यासाठी शास्त्रार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यातही राडा झालेला पाहण्यास मिळाला.
सभेच्या सुरूवातीला महंत गोविंदानंद आणि नाशिक महंतांमध्ये वाद झाला. गोविंदानंत महाराज सिंहासनावर बसले होते तर नाशिकच्या महंतांनी आम्ही त्यांच्या समोर खाली बसणार नाही त्यांनी आमच्या सोबत खाली बसून चर्चा करावी अशी मागणी केली होती. हा वाद जवळपास एक तास सुरू होता. त्यानंतर गोविंदानंद महाराजांसह इतर महंत खाली बसले, त्यानंतर सभेला सुरूवात झाली.
हे वाचलं का?
गोविंदानंद यांनी किष्किंधा हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा दावा केला होता, त्याविरोधात नाशिकमधील महंत, पुजारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्या दरम्यान दोन्हीकडून हनुमान जनस्थळाचा दावा केला जात असतांना प्रमाण आणि दाखले दिले जात होते. मात्र, आक्रमक झालेल्या महंत सुधीरदास पुजारी यांनी मीडियाचा बूम माईकच गोविंदानंद यांच्यावर उगारला. हनुमान जन्मस्थळाचा वाद बाजूला राहिला आणि वैयक्तिक आरोप सुरु झाले, साधूंना दिलेल्या पदव्यांवरून खडाजंगी झाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
किष्किंधा मठाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी वाल्मिकी रामायणातले काही पुरावे आणि संदर्भ देत हनुमानाचं जन्मस्थळ अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शृंगेरी, द्वारका येथील शंकराचार्य तसेच राम जन्मभूमी न्यासचे पूजक यांवही भेट घेऊन ह्या विषयावर 20-20 दिवस चर्चा करून ह्याविषयी त्यांना आपले म्हणणे पुराण व तुलसी रामायण संदर्भाने पटवून दिले आहे, महाराष्ट्र आणि गुजरात चा विषय असल्याने खास करून द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्याशी खास चर्चा केली असेही त्यांनी सांगितले.
वादाचे मूळ
रामायणात आणि काही ग्रंथांमध्ये हनुमान जन्मभूमीसंबंधी अंजनेरी, अंजनादरी आणि अजेंयानंदरी असे उल्लेख आहे, हे तिन्ही ठिकाण अनुक्रमे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक शी संबंधित आहेत. कर्नाटकचा दावा आहे की हनुमानाचा जन्म हम्पी जवळील किष्किंधा येथील अंजनाद्री पर्वतात झाला आहे, तर आंध्रप्रदेश चा दावा हे की हनुमानाचा जन्म तिरुमाला च्या सात डोंगर रांगामध्ये म्हणजेच सप्तगिरी च्या अंजनाद्री किंवा अजेंयानंदरी येथे झाला आहे. महाराष्ट्रात मात्र मान्यता आहे की त्रंबकेश्वर येथिल ब्रह्मगिरीच्या पर्वत रांगांमधील अंजनेरी पर्वतावर झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT