महाराष्ट्र सरकारने संथ गतीने काम करणं सोडावं, कोरोना परिस्थितीवरून भारती पवार यांची टीका
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या आणि कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईत सर्वाधिक रूग्णवाढ होते आहे. या संदर्भात राज्य सरकारने वेळीच पावलं उचलली पाहिजेत. सध्या राज्य सरकार काम करतं आहे मात्र ते संथ गतीने सुरू आहे. राज्य सरकारने गती वाढवावी असं म्हणत केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. अजित […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या आणि कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईत सर्वाधिक रूग्णवाढ होते आहे. या संदर्भात राज्य सरकारने वेळीच पावलं उचलली पाहिजेत. सध्या राज्य सरकार काम करतं आहे मात्र ते संथ गतीने सुरू आहे. राज्य सरकारने गती वाढवावी असं म्हणत केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
अजित पवार कानीकपाळी ओरडून सांगत होते मास्क लावा, ज्यांनी लावला नाही त्या सगळ्यांना झाला कोरोना
राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकारने काय दिलं नाही याबाबत राज्यातील कुणी मंत्र्याने लेखी द्यावं, असंही भारती पवारने म्हटलं. राज्याने मागणी करूनही केंद्र सरकारने दिलं नसेल, तर मी या राज्याची हक्काची मुलगी म्हणून ती माहिती मला द्या, असंही भारती पवार यांनी नमूद केलं.
महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी चाचण्या वाढवल्या पाहिजेत. त्याचे किट्स घेण्यासाठी राज्यांना निधी दिला आहे. केंद्र सरकारने पूर्ण मदत केली आहे. ओमिक्रॉनच्या आढाव्याबाबत विशेष सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकार सातत्याने गाईडलाईन्सही पाठवत आहे. मुंबईच नाही तर जिथे रूग्ण वाढतील त्यासंदर्भात काय करायचं याचे निर्देश दिले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं, कारण नसातना प्रवास करणं या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असंही भारती पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन लावायचा असेल तर तो निर्णयही राज्य सरकारला दिला आहे. केरळ आणि महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे असंही भारती पवार म्हणाल्या.