Mucor mycosis मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा, बॉम्बे हायकोर्टाची महाविकास आघाडी सरकारला सूचना

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mucormycosis मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा अशी सूचना बॉम्बे हायकोर्टाने महाविकास आघाडी सरकारला केली आहे. म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या आजारामुळे होणारे मृत्यू महाराष्ट्रात वाढत आहेत असं सरकारने कोर्टात सांगितलं. ज्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने ही सूचना केली आहे. एवढंच नाही तर या आजारात लागणारं औषध Amphotericin हे पण योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्यास कोर्टाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Mucormycosis अर्थात काळी बुरशी हा आजार नियंत्रणात आणण्याच्या औषधाचं उदाहरण देताना कोर्टाने दमण, दीव, दादरा नगर हवेली, लक्षद्विप, अंदमान यांची उदाहरणं दिली. अंदमान, दादरा आणि नगर हवेली तसंच लक्षद्विप या ठिकाणी म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची संख्या शून्य आहे. मात्र या ठिकाणी Amphotericin या औषधाचे 500 डोस देण्यात आले आहेत. ते का? असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे.

म्युकरवरचं औषध वाटप करत असताना त्यामध्ये धोरण दिसत नाही. मणिपूरमध्ये म्युकरमायकोसिसचा एक रूग्ण आहे तरीही इथे 50 डोस देण्यात आले आहेत. त्रिपुरा या ठिकाणी एक रूग्ण आहे मात्र एकही डोस देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात 82 रूग्णांचा मागील 36 तासांमध्ये म्युकरमायकोसिसमध्ये मृत्यू झाला आहे. देशातल्या 23 हजार 254 म्युकरमायकोसिसच्या रूग्णांपैकी 25 टक्के रूग्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र महाराष्ट्रात औषध पुरवठा 20 टक्केच करण्यात आला आहे. या औषधाचा साठा केंद्राने वाढवायला हवा नाहीतर आणखी मृत्यू होऊ शकतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT