भोंग्याच्या वादावर तोडगा निघणार?; सरकारने बोलावलेल्या बैठकीला राज ठाकरे जाणार नाही
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात ३ मे पर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. राज यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, भोंग्याच्या वादासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकी राज ठाकरे येणार नसल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं. (Maharashtra […]
ADVERTISEMENT

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात ३ मे पर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. राज यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, भोंग्याच्या वादासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकी राज ठाकरे येणार नसल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं. (Maharashtra government has called an all-party meeting on loudspeakers controversy)
राज्य सरकारने भोंग्यांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली असून, सकाळी ११.३० वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही हजर राहणार आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बैठकीला उपस्थित राहतील, असं बोललं जात होतं. मात्र, पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या राज ठाकरे या बैठकीला येणार नाही. त्यांच्याऐवजी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.