बेळगावसाठी महाराष्ट्रासोबत लढणारी ‘कन्नड रक्षण वेदिके’ ही संघटना आहे तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बेळगांव : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत आणि सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यावर दावा सांगितल्यानंतर या वादाला आणखी फोडणी मिळाली. यानंतर दोन्ही राज्यांतील नेत्यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवले.

ADVERTISEMENT

अशातच महाराष्ट्रातील सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौरा नियोजित झाला. त्यानंतर या मंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध सुरु झाला. आंदोलनं झाली. त्यामुळे दौरा रद्दही झाला. मात्र त्यानंतरही केवळ शाब्दिक इशाऱ्यांपर्यंत मर्यादित असलेल्या या सीमावादाने दगडफेकीमुळे हिंसक स्वरुप धारण केलं आहे.

मात्र या सर्व आंदोलनाच्या परिघात सर्वात आघाडीवर राहिली ती ‘कन्नड रक्षण वेदिके’ संघटना. याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनं केली होती. सोलापूरमध्ये कन्नड भवन बांधण्यासाठी प्रयत्नही याचं संघटनेकडून सुरु आहेत. तसंच आजची झालेली दगडफेकही याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ही संघटना नेमकी आहे तरी काय हे पाहणं महत्वाचं ठरतं.

हे वाचलं का?

‘कन्नड रक्षण वेदिके’ ही संघटना आहे तरी काय?

कन्नड रक्षण वेदिके अर्थात ‘कर्नाटक संरक्षण मंच’ असा या संघटनेचा अर्थ आहे. या संघटनेच्या वेबसाईटनुसार, कन्नड भाषेची अस्मिता जोपासणे, कन्नड भाषेचा प्रसार-प्रचार करणे, भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळण्यासाठी प्रयत्न करणे, कन्नड संस्कृतीचे संरक्षण करणे या मुद्यांवर ही संघटना आक्रमकपणे काम करत असते. अनेकदा केवळ कन्नड न बोलल्यामुळे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर्स, अधिकारी आणि इतरांना मारहाण केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत.

‘कन्नड रक्षण वेदिके’ संघटनेची स्थापना करण्यामध्ये ज्येष्ठ कन्नड लेखक आणि पत्रकार जनागेरे वेंकटरामय्या यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. त्यांच्यासोबत अन्यही सात जणांचाही संघटनेच्या स्थापनेमध्ये सहभाग होता. यात नारायण गौडा, हयात कारगल, गिरीप्पा, यदूर जनार्दनन, आनंद टी.एस. , जय देव प्रसन्न आणि प्रविण शेट्टी यांची नावं सांगितली जातात.

ADVERTISEMENT

‘कन्नड रक्षण वेदिके’ संघटनेचा पसारा जगभर :

कन्नड रक्षण वेदिके या संघटनेची व्याप्ती जगभरात पसरली आहे. संघटनेची कर्नाटकमधील तब्बल ३० जिल्ह्यांमध्ये १२ हजारांहून अधिक शाखा आहेत. त्याशिवाय, अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया आणि मलेशिया या देशांमध्येही शाखा कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी मिळून आज रोजी संघटनेचे १० लाख सभासद असल्याचं सांगण्यात येत.   

ADVERTISEMENT

कन्नड रक्षण वेदिके संघटनेचं मुख्य कार्यालय बेंगलोमध्ये आहे. कर्नाटक डिफेन्स फोरम क्र. 19, पहिला मजला, गोकुळ बिल्डिंग, 6 वा मेन रोड, गांधीनगर, बंगलोर 560009 असा संघटनेच्या मुख्य कार्यालयाचा पत्ता आहे.

कन्नड रक्षण वेदिकेची काही गाजलेली आंदोलनं :

  • २००५ साली महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव पालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रात विलीन होण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महापौर विजय मोरे यांच्या चेहऱ्याला काळं फासले होते. त्यानंतर तत्कालीन कर्नाटक सरकारने पालिका बरखास्त केली.

  • २००७ साली कावेरी पाणी वाटपाबाबत लवादाचा निर्णय कर्नाटकवर अन्याय करणारा असल्याचं म्हणतं कन्नड रक्षण वेदिकेने कर्नाटक बंदची हाक दिली होती. कर्नाटकमध्ये या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

  • २००७ मध्येच कन्नड रक्षण वेदिके आणि इतर काही कन्नड संघटनांनी दिल्लीत दोन लाख सदस्यांचा मोर्चा काढला होता. त्यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना पाणी वाटपाबाबत निवेदन देण्यात आलं होतं.

  • तामिळनाडूसोबतच्या पाणी वाटप मुद्यावरुन तामिळींविरोधातही कन्नड रक्षण वेदिकेने अनेकदा आंदोलन केलं आहे.

  • याशिवाय कर्नाटकमधील चित्रपटगृहांमध्ये तामिळ चित्रपट दाखविण्यास विरोध करणे, तामिळ वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद पाडणे, अशी आंदोलनंही करण्यात आली होती. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT