त्यांचे अश्रू पुसायला हवे म्हणून मी हे ट्वीट करतोय -जितेंद्र आव्हाड
राजपुरी हळदीला मिळाला 11 हजार 500 दर आज साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेमध्ये हळद सौद्यांचा नवीन वर्षातला शुभारंभ पार पडला आहे. हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे आणि साडेतीन मुहूर्त पैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे मराठी नव वर्षात सौदे काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या सौद्यांमध्ये हळदीला उच्चांक […]
ADVERTISEMENT

राजपुरी हळदीला मिळाला 11 हजार 500 दर
आज साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेमध्ये हळद सौद्यांचा नवीन वर्षातला शुभारंभ पार पडला आहे. हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे आणि साडेतीन मुहूर्त पैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे मराठी नव वर्षात सौदे काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या सौद्यांमध्ये हळदीला उच्चांक दर देखील मिळतो,आज पार पडलेल्या या हळद सौद्यांमध्ये 11 हजार 500 इतका सरासरी उच्चांक दर मिळाला आहे. कर्नाटकच्या रायबाग येथील शेतकऱ्यांच्या राजापुरी हळदीला हा दर मिळाला आहे.सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि हळद व्यापारी यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्ताच्या हळदीचे पूजन करून हळदीच्या सौंदयांचा शुभारंभ झाला आहे.
त्यांचे अश्रू पुसायला हवे म्हणून मी हे ट्वीट करतोय -जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “डोंबिवली-शीळफाटा रस्त्यावर असलेल्या लोढा पलावा मधील काही ईमारतींना तडे गेले आहेत. तर काही ईमारती खचल्या आहेत. अशी जोरदार बातमी चर्चेला येत आहे. त्याबाबतची काही छायाचित्र देखील आलेली आहेत. एवढ्या नामांकित विकासकाच्या ईमारती 5-10 वर्षात खचायला लागल्या तर एकंदरीतच विकासकाने केलेली ईमारतीची उभारणी आणि त्याचा दर्जा याबद्दल शंका निर्माण होते.”
“या ईमारतींमध्ये फ्लॅट विकत घेणारे हे नोकरी करणारे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामधील सर्वाधिक रहिवाशी हे मराठी आहेत. ईमारत खाली करायला लावली, पण त्यांना फर्निचर देखील हलवू दिले नाही. फर्निचरची किंमत देखील 20-25 लाख इतकी आहे. मराठी माणसाला हे परत उभे करणं परवडणारे नाही. तिथे राहणाऱ्या सर्व समाजबांधवांबद्दल मला प्रचंड वाईट वाटत आहे. मला दूरध्वनीद्वारे अनेक रहिवाशांनी अश्रू ढाळत ही बातमी सांगितली. त्यांचे अश्रू पुसायला हवे म्हणून मी हे ट्वीट करीत आहे. उद्या या ईमारतींची परिस्थिती देखील बघायला जाणार आहे”, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
डोंबिवली-शीळफाटा रस्त्यावर असलेल्या लोढा पलावा मधील काही ईमारतींना तडे गेले आहेत. तर काही ईमारती खचल्या आहेत. अशी जोरदार बातमी चर्चेला येत आहे. त्याबाबतची काही छायाचित्र देखिल आलेली आहेत. एवढ्या नामांकित विकासकाच्या ईमारती 5-10 वर्षात खचायला लागल्या तर एकंदरीतच विकासकाने केलेली… pic.twitter.com/Sv5KTW2lHq
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 22, 2023