Maharashtra Lockdown: महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत एक मोठी अपडेट, ‘हे’ निर्बंध लागणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात कठोर लॉकडाऊन जारी केलं जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत:च घोषणा करण्याची शक्यता आहे. पण आता याच लॉकडाऊनबाबत ‘मुंबई तक’ला एक नवी माहिती मिळाली आहे. राज्यातील लॉकडाऊन नेमका कसा असणार याबाबत सध्या नागरिकांचा मनात संभ्रम आहे. गेल्या लॉकडाऊनप्रमाणेच आता देखील लॉकडाऊन असणार का? असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. याचबाबत आता आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत आता खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. गेल्या वेळीप्रमाणेच यावेळी देखील कठोर लॉकडाऊन असणार आहे. नेमके काय निर्बंध असणार आहेत हे जाणून घेऊयात थोडक्यात:

  • आंतरजिल्हा प्रवासावर कठोर निर्बंध लावण्यात येऊ शकतात आहेत. गेल्या वेळी ज्या प्रमाणे जिल्हा बंदी करण्यात आली होती त्याचप्रमाणे यावेळी देखील बंदी असण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • शहरातील परिवहन सेवा बंद केली जाणार नसल्याचं समजतं आहे.

  • अत्यावश्यक सेवांच्या संबंधित आस्थापनांवर देखील काही निर्बंध असतील (वेळेसंदर्भात)

  • ADVERTISEMENT

  • मार्केटमधील गर्दी होणाऱ्या ठिकाणी देखील कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात.

  • ADVERTISEMENT

  • विनाकारण भटकणाऱ्यांना जबर दंड ठोठावला जाऊ शकतो.

  • राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण हे सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्यातील परिस्थिती ही अत्यंत गंभीर झाली आहे. अशावेळी आता मुख्यमंत्री कठोर लॉकडाऊन करणार की नाही याकडेच लोकांचं लक्ष असणार आहे.

    महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन लागणार आहे लॉकडाऊनची घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. लॉकडाऊनबद्दल नव्या गाईडलाईन्सही जाहीर होणार आहेत. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच दिली होती.

    पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार?

    मात्र, असं असलं तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संबोधित करताना असं म्हटलं होतं की, Lockdown हा शेवटचा पर्याय म्हणून अवलंबवावा. असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केलं होतं. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर आता मुख्यमंत्री कठोर लॉकडाऊनचा निर्णय घेणार की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

    राज्यात नवे निर्बंध देखील लागू

    दरम्यान, राज्यात कालपासून (20 एप्रिल) नवे नियम देखील लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात आता आरोग्य सेवेशी संबंधित दुकानं वगळता सर्व दुकानं ही सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT