MLC Election : विधानसभेवेळी डावललेल्या बावनकुळेंबद्दल भाजपाची भूमिका का बदलली?
–योगेश पांडे, नागपूर राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची शुक्रवारी रात्री घोषणा केली. यात नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री आणि पक्षाचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, विधानसभेच्या वेळी बावनकुळे यांची इच्छा असतानाही भाजपाने तिकीट दिलं नाही. मात्र, विधान परिषद निवडणुकीत भाजपाने बावनकुळे यांना मैदानात उतरवलं. त्यामुळे […]
ADVERTISEMENT

–योगेश पांडे, नागपूर
राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची शुक्रवारी रात्री घोषणा केली. यात नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री आणि पक्षाचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, विधानसभेच्या वेळी बावनकुळे यांची इच्छा असतानाही भाजपाने तिकीट दिलं नाही. मात्र, विधान परिषद निवडणुकीत भाजपाने बावनकुळे यांना मैदानात उतरवलं. त्यामुळे पक्षाची अचानक भूमिका का बदलली, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा बावनकुळे यांची होती. त्यावेळी त्यांनी पत्नीला उमेदवारी देण्याबद्दलही भूमिका घेतली होती. मात्र, भाजपने भूमिका बदलली नाही. आता उमेदवारी देण्यात आल्याने प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. राजकीय समीकरणं बदललण्याने आणि त्याचा परिणाम विविध निवडणुकांत दिसून आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा ओबीसी चेहरा समोर केल्याचं बोललं जात आहेत. बावनकुळे यांना उमेदवारी देण्यामागे काही राजकीय समीकरणं असल्याचं दिसत आहे.
MLC Election : विधानसभेला डावललेल्या बावनकुळेंना तिकीट; भाजपाचे 5 उमेदवार जाहीर