बावनकुळेंचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी; फडणवीसांचा महाविकास आघाडीला दिला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील दोन विधान परिषद निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. दोन्ही जागांवर भाजपने दणदणीत विजय संपादित केला असून, नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर अकोल्यातून वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत. या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. हा विजय भविष्यातील विजयाची नांदी असल्याचं सांगत फडणवीसांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे इशाराही दिला.

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीच्या दोन जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, “आज मला अतिशय आनंद होत आहे. माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. खरं म्हणजे मी स्वतः जेव्हा निवडून आलो, तेव्हा मला तितका आनंद झाला होता, त्यापेक्षाही जास्त आनंद मला आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे”, असं फडणवीस म्हणाले.

विधान परिषद निवडणूक : नागपूर, अकोल्यात भाजपने उधळला गुलाल; शिवसेनेला मोठा धक्का

हे वाचलं का?

“नागपूरप्रमाणेच अकोल्यामध्ये वसंत खंडेलवाल यांनाही निर्णायक विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या या निवडणुका बघितल्या, तर सहा पैकी चार जागी भाजप निवडून आली आहे. तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सर्व प्रकारचा विजय होऊ शकतो, असं जे गणित मांडलं जात होतं. ते चुकीचं आहे, तेही या विजयाने स्पष्ट केलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

“महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठिशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. मला असं वाटत चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी आहे. मी आमचे राष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून चंद्रशेखर बावनकुळेंसह इतरांना उमेदवारी दिली.

ADVERTISEMENT

“नितीन गडकरी यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका लढलो. अत्यंत विजय आम्हाला मिळाला आहे. निश्चितच विजयाच्या मालिकेची सुरूवात याठिकाणी झाली आहे. महाविकास आघाडीची मतं अकोला आणि नागपूमध्ये आम्हाला मिळाली. ज्यांनी आम्हाला मतं दिली, आमच्यावर विश्वास दाखवला त्यांचे मी आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

“भाजप नागपूरमध्ये मजबूत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे. विदर्भातील दोन्ही जागा आम्ही जिंकलो आहोत. आगामी महापालिका निवडणुकांमध्येही भाजप राज्यात नंबर एकचा पक्ष ठरेल”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT