Live : पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयाचा ‘तो’परवाना रद्द होणार? सरकार नेमणार समिती
पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयाचा ‘तो’परवाना रद्द होणार? किडनी रॅकेट प्रकरणाचा मुद्दा आज विधानसभेत चर्चेला आला. या मुद्द्यावर बोलताना भाजपचे आमदार राम सातपुते म्हणाले की, “मंत्र्यांनी चौकशी करू असं सांगितलं. या रुबी हॉलने कोल्हापुरात एका हॉटलेमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला एजंटमार्फत आणून त्या महिलेची किडनी काढली. रवी गायकवाड आणि अभिजित मदने नावाच्या एजंटने डॉ. अभय सदरेच्या […]
ADVERTISEMENT

पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयाचा ‘तो’परवाना रद्द होणार?
किडनी रॅकेट प्रकरणाचा मुद्दा आज विधानसभेत चर्चेला आला. या मुद्द्यावर बोलताना भाजपचे आमदार राम सातपुते म्हणाले की, “मंत्र्यांनी चौकशी करू असं सांगितलं. या रुबी हॉलने कोल्हापुरात एका हॉटलेमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला एजंटमार्फत आणून त्या महिलेची किडनी काढली. रवी गायकवाड आणि अभिजित मदने नावाच्या एजंटने डॉ. अभय सदरेच्या मदतीने साळुके नावाच्या माणसाला किडनी विकली. त्यावेळच्या सरकारने अवयव प्रत्यारोपान परवान्याला स्थगिती दिली आणि या मंत्र्यांनी तात्काळ स्थगिती उठवली. या महिलेचा जीव नाही का? किडनी रॅकेट प्रकरणात रुबी हॉल रुग्णालयाचे जे सहभागी आहेत, त्यांच्या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली गुन्हा दाखल करणार का आणि रूबी हॉल रुग्णालयाचे अवयव प्रत्यारोपणाचा परवाना रद्द करणार का?”
त्यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिलं. सावंत म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांना परवाना देण्यात आलेला आहे. दोन आरोपीही अटकेत आहे. आरोपपत्र दाखल झालेलं नाही. परवाना थेट रद्द करणं चुकीचं वाटतं, तरी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, एक अशासकीय डॉक्टर, एक शासकीय डॉक्टर यांची एक समिती स्थापन करू आणि तीन महिन्यात अहवाल घेऊन त्यावर योग्य कारवाई करू.”
उपसभापती नीलम गोऱ्हेंची नाराजी; विधानसभेत आशिष शेलार-भास्कर जाधव भिडले
आशिष शेलार म्हणाले, “या सदनानाच अवमान होण्याची स्थिती किंवा अवमान होईल, असं कुणाच्या मनात नसतं. तसं कुणी करेल असं नाही, पण तरीही… दोन सभागृह आहेत आणि वरच्या सभागृहाचं कामकाज वेगळं चालतं. शक्यतो आपण दोन्ही सभागृहाबद्दल चर्चा एकमेकांच्या सभागृहात करत नाही. काल विधान परिषदेत चर्चा झाली. त्यातून वर्तमान पत्रात बातम्या आल्या. त्यातून वरिष्ठ सभागृह कुठलं? अधिकार कुणाचे? विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबद्दल चर्चा व्हावी इथपर्यंत चर्चा विधान परिषदेत झाली. दोन्ही सभागृहांनी एकमेकांना मानसन्मान देऊन समजूतीने चाललं पाहिजे. त्यातही काही गोष्टी असतील, तर दालनामध्ये या विषयी चर्चा करणं अपेक्षित आहे.
अध्यक्षांनी एक निर्णय घेतला आणि त्यावर कार्यवाही सुरू झाली. त्यावरून वरच्या सभागृहात सदस्य पॉाईंट ऑफ ऑर्डरद्वारे बोलले आणि त्यावर सभागृहाच्या उपसभापतींनी त्यावर भाष्य केलं. काही निर्देश दिले. निर्णय दिले. त्याचा पूर्ण सन्मान राखून, मी बोलत आहे. भारतीय संविधानात याची संपूर्ण स्पष्टता आहे.