अमरावतीत रेल्वेचा मोठा अपघात, २० डबे रूळावरून घसरल्याने वाहतूक ठप्प

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावतीत रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास १५-२० डबे रूळावरून घसरले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर नागपूर मुंबई मार्गावरच्या अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर मालगाडीचे १५-२० डबे घसरले. कोळसा घेऊन जाणारी ही मालगाडी इंजिनासह रूळावर घसरली. रेल्वे रूळावरून घसरल्याने मोठा आवाज झाला. एकापाठोपाठ रेल्वेचे १५-२० डबे रूळावरून खाली घसरले. मालगाडीचे इंजिन हे रूळाच्या बाजूला कोसळले. तर काही डबे हे रूळावर आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान नागपूर, मुंबई जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली आहे. तर काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे डबे रूळावरून बाजूला करण्याचं काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमध्ये ही घटना घडली आहे. घटना स्थळी रेल्वे रूळावर आणण्याचं काम सुरू आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT