सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे हेलिकॉप्टर भेळ, तुम्ही पाहिलात का व्हीडिओ?
चमचमीत खाद्यपदार्थ खायला कुणाला आवडत नाही? भेळ, पाणी पुरी, बटाटेवडा, समोसा, पाव-भाजी, सँडविच अशी कितीतरी खाद्यपदार्थांची नावं घेता येतील. अशात सध्या सोशल मीडियावर हेलिकॉप्टर भेळ चांगलीच चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर या भेळेचा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हेलिकॉप्टर भेळ असं या भेळेचं वर्णन का केलं जातं आहे त्याचं कारण आहेच. सोशल मीडियावर व्हायरल झाला हेलिकॉप्टर भेळेचा […]
ADVERTISEMENT
चमचमीत खाद्यपदार्थ खायला कुणाला आवडत नाही? भेळ, पाणी पुरी, बटाटेवडा, समोसा, पाव-भाजी, सँडविच अशी कितीतरी खाद्यपदार्थांची नावं घेता येतील. अशात सध्या सोशल मीडियावर हेलिकॉप्टर भेळ चांगलीच चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर या भेळेचा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हेलिकॉप्टर भेळ असं या भेळेचं वर्णन का केलं जातं आहे त्याचं कारण आहेच.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर व्हायरल झाला हेलिकॉप्टर भेळेचा व्हीडिओ
भेळ तयार करण्याची हटके स्टाईल असल्याने या भेळेला हेलिकॉप्टर भेळ असं नाव देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. गेल्या वर्षी फ्लाइंग डोसा बनवला गेल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. उडता वडा-पाव, उडता दही वडा, नागपूरचा अनोख्या पद्धतीने चहा देणारा चहावाला. हे सगळे व्हीडिओ व्हायरल झाले होते. अशात हेलिकॉप्टर भेळ व्हायरल होते आहे.
काय आहे हेलिकॉप्टर भेळेच्या व्हीडिओत?
हेलिकॉप्टर भेळेच्या या व्हीडिओत भेळवाला अत्यंत विद्युत वेगाने भेळ मिक्स करतो आहे. एक स्ट्रीट फूड विक्रेता भेळपुरी तयार करतो आहे. त्याचा भेळ तयार करण्याचा वेग पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. भेळपुरी हा लोकांना आवडता प्रकार आहे. भेळेत कुरमुरे, शेव, फरसाण, उकडलेला बटाटा, चिरलेला कांदा आणि टॉमेटो असं सगळं मिक्स असतं. दोन प्रकारच्या चटण्याही असतात एक गोड चटणी आणि तिखट चटणीही असते. भांड्यात हे सगळं एकत्र करून भेळ नंतर प्लेटमध्ये काढली जाते. हा भेळवाला हेच सगळे घटक घालून भेळ तयार करतो आहे. मात्र त्याचा विद्युत वेग पाहून लोकांनी या भेळेला हेलिकॉप्टर भेळ असं नाव दिलं आहे.
हे वाचलं का?
@Trollgramofficial या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका युजरने हा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओला 3,410 लाइक्स मिळाले आहेत. आणखी थोडा वेगाने हा भेळवाला भेळ फिरवत असता तर यातून वीज निर्मिती झाली असती अशा काही कमेंट लोकांनी केल्या आहेत.
सोशल मीडियावर या भेळेचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. This guy thought its BHEL – BHARAT HEAVY ELECTRICALS LIMIITED अशी ही कमेंट एका युजरने दिली आहे. भेळ बनवण्याची ही खास पद्धत लोकांना चांगलीच आवडली आहे. हा भेळवाला कुठला आहे? त्याचा हा ठेला कुठे आहे ते समजू शकलेलं नाही. मात्र त्याचा वेग आणि त्याची भेळ बनवण्याची अनोखी पद्धत लोकांना चांगलीच भावली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT