मराठा क्रांती मोर्चा करणार Neeraj Chopra चा सत्कार, राज्यस्तरीय बैठकीत ठराव पास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलची कमाई करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रावरुन आता देशात नवीन विषयाला फाटा फुटताना दिसत आहे. नीरज चोप्रा हा हरियाणातल्या पानिपत गावचा. पानिपत युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर जे सैनिक व कुटुंब हरियाणात राहिली ती कालांतराने रोड मराठा समाज म्हणून ओळखली जाऊ लागली. नीरज चोप्रा याच रोड मराठा समाजाचा आहे.

ADVERTISEMENT

राज्यात मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानेही नीरज चोप्राचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय व्यापक बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत १३ वर्षांनी भारताला सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राचं अभिनंदन करुन त्याच्या कौतुकाचा ठराव करण्यात आला. पानीपत युद्धात देशाच्या रक्षणासाठी मराठा सैन्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. नीरज चोप्रा हा याच मराठा समाजाचा मुलगा असल्यामुळे त्याचं अभिनंदन करुन सत्कार करण्याचा ठराव या बैठकीत पार पडला.

हे वाचलं का?

२००८ साली बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं होतं, त्यानंतर सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. जर्मनी, चेक रिपब्लीक, पाकिस्तान यांचं कडवं आव्हान मोडून काढत नीरजने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

ADVERTISEMENT

Tokyo Olympics मध्ये सुवर्णाध्याय लिहिणाऱ्या Neeraj Chopra चं महाराष्ट्र कनेक्शन माहिती आहे का?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT