अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा अपघात, जीव वाचल्यानंतर भावूक पोस्ट करत म्हणाल्या…
अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारला अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडली आहे. आमचा जो अपघात झाला त्यात कार उद्ध्वस्त झाली आहे पण आमचा जीव वाचला आहे. या आशयाची एक भावूक पोस्ट किशोरी शहाणे यांनी लिहिली आहे. आपण सुरक्षित आहोत ही माहिती त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. काय आहे किशोरी शहाणे यांची […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारला अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडली आहे. आमचा जो अपघात झाला त्यात कार उद्ध्वस्त झाली आहे पण आमचा जीव वाचला आहे. या आशयाची एक भावूक पोस्ट किशोरी शहाणे यांनी लिहिली आहे. आपण सुरक्षित आहोत ही माहिती त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
काय आहे किशोरी शहाणे यांची फेसबुक पोस्ट?
आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई. असं म्हणत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
किशोरी शहाणे एका कार्यक्रमाला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात भीषण होता हे किशोरी शहाणे यांची फेसबुक पोस्ट आणि त्यावरचे फोटो पाहून कळतं आहे. त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे या गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत आहेत. माहेरची साडी हा त्यांचा गाजलेला सिनेमा होता. तसंच क्लासमेट या सिनेमातही त्यांची भूमिका खूप गाजली होती.