Marathi in Supreme Court : जेव्हा जस्टिस चंद्रचूड हरिश साळवेंना म्हणाले ‘जाऊ द्या!’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तामिळनाडूमध्ये वेदांता ऑक्सिजन प्रकल्प पुन्हा उघडण्यासाठी राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे. तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टाला ही माहिती दिली आहे. याबाबतची सुनावणी सुरू असताना जस्टिस चंद्रचूड हे चक्क जाऊ द्या असं मराठीत म्हणाले आहेत. वेदांताचे वकील हरिश साळवे जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांचं बोलणं झाल्यानंतर चंद्रचूड यांनी हा उल्लेख केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा होते आहे. न्या. चंद्रचूड आणि न्या. हरिश साळवे यांच्यातला हा संवाद भले एका शब्दाचा असेल मात्र सुप्रीम कोर्टात मराठी संवाद झाल्याने या संवादाची चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार’, कोर्ट प्रचंड संतापलं!

नेमकं काय घडलं सुप्रीम कोर्टात?

हे वाचलं का?

तामिळनाडूच्या वेदांता ऑक्सिजन प्लांटबाबत सुनावणी सुरू होती. सुप्रीम कोर्टाला राज्य सरकारने सांगितलं की हा प्लांट पुन्हा सुरू करण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत एकमत झालं आहे. कोरोनाचं संकट पाहून हा प्लांट आम्ही पुन्हा सुरू करणार आहोत.

तामिळनाडू सरकारतर्फे काय सांगण्यात आलं?

ADVERTISEMENT

आम्हाला पुरवठा द्या..

ADVERTISEMENT

सुप्रीम कोर्ट

तुमच्याकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे, पुरवठा कुणाला करायचा याचा निर्णय केंद्र सरकारचा आहे.

त्यावेळी वेदांता प्लांटला विरोध दर्शवणाऱ्या संघटनेचे वकील कोलिन गोनजाल्विस म्हणाले- आम्हाला ऑक्सिजन हवा आहे आम्ही राष्ट्रविरोधी नाही राष्ट्रहिताचाच विचार करतो.

त्यावर वेदांताची बाजू मांडणारे वकील हरिश साळवे हे तिखट शब्दांमध्ये म्हणाले की -‘तुमच्या संघटनेत अनेक लोक राष्ट्रविरोधी आहेत.’

हरिश साळवे यांनी हे वाक्य उच्चारताच न्या. चंद्रचूड मराठीत म्हणाले जाऊ द्या!

कोण आहेत न्या. चंद्रचूड?

न्या. चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ते एका मराठी कुटुंबात जन्मले त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यानंतर ते नवी दिल्लीतही शिकत होते. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते LLB झाले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM ही पदवी मिळवली. तसंच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन गौरवले. न्यायशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडीही केली.

बॉम्बे हायकोर्टात वकिली करत असताना चंद्रचूड यांनी रिझर्व्ह बँक, ONGC, अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मार्च 2000 मध्ये बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ऑक्टोबर 2013 ते अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती झाले. मे 2016 ला ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.

कोण आहेत हरिश साळवे?

हरिश साळवे यांचाही जन्म महाराष्ट्रातला आहे. भारतातले एक प्रसिद्ध वकील म्हणून त्यांचा लौकिक आहे. कधी सलमान खानचे वकील म्हणून त्यांच्यावर टीका झाली तर कधी कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढण्यासाठी त्यांनी फक्त एक रूपया मानधन घेतलं म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला आहे. हरिश साळवे यांचे वडील एनकेपी साळवे हे विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते होते. विदर्भवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती. हरिश साळवे यांचं मूळ गाव नागपूर. त्यांनी आधी सीएचं शिक्षण घेतलं त्यानंतर ते वकिली व्यवसायात दाखल झाले. प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांनी सल्ल्यानुसार त्यांनी वकिलीचं शिक्षण सुरू ठेवलं. हरिश साळवे यांच्या कारकिर्दीची सुरूवात 1975 मध्ये झाली. दिलीप कुमार यांचा खटला त्यांनी लढवला होता. वडिलांना ते या खटल्यात मदत करत होते.

आज याच दोन महाराष्ट्रातल्या माणसांचा सुप्रीम कोर्टात मराठीत संवाद झाला. सुप्रीम कोर्टात मराठी संवादाची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT