“शिवसेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवणार” तुरुंगातून संजय राऊत यांचं वक्तव्य
शिवसेनेचा धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव दोन्ही गोठवण्यात आलं. त्यामुळे आता शिवसेना नवं चिन्ह आणि नवं नाव काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. शिवसेनेचे खासदार आणि मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत हे पत्राचाळ तुरुंगात आहेत. मात्र या सगळ्या घडामोडींवर संजय राऊत […]
ADVERTISEMENT

शिवसेनेचा धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव दोन्ही गोठवण्यात आलं. त्यामुळे आता शिवसेना नवं चिन्ह आणि नवं नाव काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. शिवसेनेचे खासदार आणि मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत हे पत्राचाळ तुरुंगात आहेत. मात्र या सगळ्या घडामोडींवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह का गोठवलं? पुढे पर्याय काय?
काय म्हटलं आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी?
शिवसेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल. याआधी ज्या पक्षांची चिन्हं गोठवली गेली आहेत ते पक्ष मोठे झाले आहेत, आम्हीही मोठे होऊ, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनेत घडलेल्या घडामोडींवर भाष्य आलं आहे. तुरुंगात रोज सकाळी येणाऱ्या वर्तमान पत्रांच्या माध्यमातून संजय राऊत हे राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! शरद पवारांचं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठं विधान, म्हणाले…