रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने पुरुषांचा जीव धोक्यात! धक्कदायक माहिती आली समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उन्हाळ्याच्या रात्री तापमान वाढल्याने पुरुषांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. एका नव्या अभ्यासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अभ्यासानुसार, सामान्य उष्णतेपेक्षा फक्त 1 अंश सेल्सिअसने तापमाने वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यूचा धोका सुमारे 4 टक्क्यांनी वाढतो. बीएमजे ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन संशोधनानुसार रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने मृत्यूचा धोका फक्त पुरुषांमध्येच दिसून आला आहे. मात्र, याचा महिलांवर कोणताही परिणाम होत नाही.

ADVERTISEMENT

मागील अभ्यासात असे आढळून आले होते की, उष्ण हवामानामुळे मृत्यू आणि हृदयरोग रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, यामध्ये कोणत्याही विशिष्ट वयोगटातील लोकांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे टोरंटो विद्यापीठाच्या एका टीमने 60 ते 69 वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे कारण काय हे जाणून घेतलं. या अभ्यासासाठी, संशोधकांनी 2001 ते 2015 दरम्यान जून-जुलैमध्ये हृदयविकारामुळे झालेल्या मृत्यूंबाबत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून डेटा गोळा केला.

अभ्यासासाठी, संशोधकांनी इंग्लंड आणि वेल्स सारखे देश निवडले, कारण या महिन्यांत युनायटेड किंगडममध्ये उष्णता सर्वात वेगवान असते. त्याने किंग काउंटी, वॉशिंग्टन येथूनही असाच डेटा गोळा केला, जिथे हवामान जवळजवळ सारखेच आहे.

हे वाचलं का?

2001 ते 2015 दरम्यान, इंग्लंड आणि वेल्समध्ये एकूण 39,912 लोक हृदयविकाराने मरण पावले, तर किंग काउंटीमध्ये 488 लोक मरण पावले, असे डेटावरून दिसून आले. संशोधकांना असे आढळून आले की, इंग्लंड आणि वेल्समध्ये तापमानात 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्याने 60 ते 64 वयोगटातील पुरुषांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 3.1 टक्के एवढा आहे. या वर्गात वृद्ध आणि महिलांचा समावेश नव्हता.

त्याच वेळी, किंग काउंटीमध्ये तापमानात 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्यामुळे 65 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका 4.8 टक्के वाढला आहे. संशोधकांनी इंग्लंड आणि वेल्ससारख्या देशांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण अलीकडेच येथे रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, हा डेटा पाहता, मध्य-अक्षांश ते उच्च-अक्षांश भागात राहणाऱ्या लोकसंख्येच्या जोखमीची देखील समान तपासणी केली पाहिजे.

ADVERTISEMENT

Explainer : उत्तम शरीरयष्टी असलेल्या Siddarth Shukla चं निधन, तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं महत्वाचं कारण

ADVERTISEMENT

या लक्षणांवर ठेवा लक्ष

हृदयविकारामुळे हृदयविकाराचा झटका किंवा कार्डिएक अरेस्टसारख्या घटना घडू शकतात. रात्रीचा घाम येणे, छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणं ही लक्षणे हृदयविकाराची लक्षणे असू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका अहवालानुसार, इंग्लंडमध्ये दरवर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे सुमारे 80,000 लोक रुग्णालयात जातात. त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT