कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जाणं टाळलं? दौरा अचानक रद्द
औरंगाबाद : संपूर्ण देशभरात उत्साहात दिवाळी साजरा होत असताना मराठवाड्यात मात्र शेतकऱ्यांची दिवाळी दुःखात साजरी होत आहे. परतीच्या पावसानं झालेलं पीकांचं नुकसान आता कसं भरुन काढायचं या चिंतेतं शेतकरी आहे. अशातच रविवारी सायंकाळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अब्दुल सत्तार रविवारी सायंकाळी पळशी येथे येणार होते. यावेळी आपल्या […]
ADVERTISEMENT
औरंगाबाद : संपूर्ण देशभरात उत्साहात दिवाळी साजरा होत असताना मराठवाड्यात मात्र शेतकऱ्यांची दिवाळी दुःखात साजरी होत आहे. परतीच्या पावसानं झालेलं पीकांचं नुकसान आता कसं भरुन काढायचं या चिंतेतं शेतकरी आहे. अशातच रविवारी सायंकाळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
अब्दुल सत्तार रविवारी सायंकाळी पळशी येथे येणार होते. यावेळी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडण्यासाठी शेतकरी, नागरिक जमा झाले होते. मात्र कृषीमंत्र्यांचा दौरा रद्द केल्याचं ऐनवेळी शेतकऱ्यांना कळविण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोषाला सामोरं जाणं सत्तार यांनी टाळलं का? आमचं म्हणणं ऐकण्यासाठी कृषिमंत्र्यांना वेळ नाही तर मग न्याय मागचा कोणाला? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
पळशीत शेतकऱ्यांनी लावला आगळावेगळा स्टॉल :
पळशी येथील शेतकऱ्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर भाजीचा एक आगळावेगळा स्टॉल लावला आहे. या स्टॉलमध्ये खराब भाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सण साजरा करायला, कुटुंबियांना नवीन कपडे, फटाके किंवा किराणा सामान आणायला पैसे नाहीत.
हे वाचलं का?
त्यामुळे खराब भाजीपाला सरकारनं विकत घ्यावा आणि आम्हाला पैसे द्यावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. सरकारनं स्वस्तात आनंदाचा शिधा देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी ते घेण्यापुरते देखील पैसे आमच्याकडे शिल्लक नाहीत. त्यामुळे आम्ही हा स्टॉल लावल्याच पळशीतील शेतकऱ्यांनी सांगितलं.
परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल :
मराठवाड्यात परतीच्या पावसानं हाता-तोंडाशी आलेली पीक खराब झाली आहेत. शेतकऱ्यांपुढे पडला आहे. मका, कांदा, टोमॅटो, सोयाबीन या सर्व पिकांना पावसाचा फटका बसला आहे. काढून विक्रीसाठी ठेवलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता दिवाळी साजरी कशी करायची हा प्रश्न? शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT