अल्पवयीन मुलाने तरुण मित्राची दगडाने ठेचून केली हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी दिल्लीतील बवाना येथील विजय कॉलनी परिसरात एका बंद खोलीत तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता, जिथे तो भाड्याने राहत होता. याच तरुणाच्या हत्येचे (Murder) गूढ दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अखेर उकलले आहे.

ADVERTISEMENT

एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी तरुण ज्या खोलीत भाड्याने राहत होता तिथे पोलीस पोहचले. त्यांनी जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना तरुण घरातच रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. यावेळी तरुणाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.

असं उकललं हत्येचं गूढ

हे वाचलं का?

या प्रकणी जेव्हा पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा पोलिसांना अशी माहिती मिळाली की, मयत तरुणाने बवाना येथील जेजे कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणीशी लग्न देखील केले होते. यासोबतच या तरुणाचा एक मित्रही त्याच्यासोबत भाड्याच्या घरात येत-जात असे.

अशी माहिती मिळताच पोलिसांनी तांत्रिक सहाय्य आणि काही माहितीच्या आधारे पोलिसांनी जेजे कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाची चौकशी केली. चौकशी दरम्यान, पोलिसांचा या मुलाबाबत संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी मुलाकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

ADVERTISEMENT

‘झोपलेल्या तरुणाची केली हत्या’

ADVERTISEMENT

चौकशीत अल्पवयीन मुलाने तो मृत आदर्शच्या खोलीत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. आदर्श हा अल्पवयीन मुलाचा खूप छळ करायचा आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तो त्याचा छळ करायचा.

घटनेच्या दिवशी दोघेही खोलीत एकत्र होते. त्यावेळी देखील आदर्शने मुलाचा कोणत्या तरी गोष्टीवरुन छळ केला. त्यामुळे मुलगा प्रचंड संतापला. पण त्याने त्यावेळी काहीही केलं नाही. जेव्हा आदर्श झोपी गेला तेव्हा अल्पवयीन मुलाने आदर्शच्या डोक्यावर विटांनी प्रचंड वार केले आणि त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून दिलं. घराबाहेर पडण्याआधी आरोपी मुलाने आदर्शचे हात बांधून ठेवले आणि नंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून पळ काढला.

भयंकर! आईने पकडून ठेवलं अन्…; धडावेगळं केलेलं शीर घेऊन भाऊ लोकांना म्हणाला ‘पाहा, हिचं काय केलं’

अनेक दिवस मृतदेह खोलीतच बंद होता. अखेर खोलीतून मृतदेहाला दुर्गंधी सुटल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांनी समजली. अखेर आता पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठवलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT