चित्रा वाघांचा ‘वार’! म्हणाल्या, “सुप्रिया ताई, सरड्याला पण लाज वाटली असेल”
मीरा रोड हत्याकांडावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलं. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
Mira Road Murder : मीरा रोड परिसरात एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. मरिन ड्राईव्हला विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्यानंतर मीरा रोडची घटना उजेडात आली. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करण्यात आले. मीरा रोड हत्याकांडावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलं. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं. (chitra wagh attacks on supriya sule after her criticises devendra fadnavis)
ADVERTISEMENT
मीरा रोड भागात लिव्ह इन पार्टनरची मनोज साने या व्यक्तीने हत्या केली. या अत्यंत क्रूरपणे ही महिलेची हत्या करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.
सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांना काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं. ज्यात त्या म्हणाल्या, “मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> Mira Road Murder: तीन बकेट रक्त… प्रेयसीचे तुकडे कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरमध्ये वाटले
याच हत्याप्रकरणावरून सुळे पुढे म्हणाल्या, “गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावे”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोलाही लगावला.
मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे.
गुन्हेगारांना या राज्यात…
— Supriya Sule (@supriya_sule) June 8, 2023
ADVERTISEMENT
चित्रा वाघांचं सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं. “सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो सुप्रिया सुळे. तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं”, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो @supriya_sule
तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 8, 2023
हेही वाचा >> ठाण्यात बॅनर ‘वॉर’! आव्हाडांना डिवचलं, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सवाल
“श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच! मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस जी या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही,मोठठ्या ताई…”, असं खोचक उत्तर चित्रा वाघ यांनी दिलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT