का वाढलं मिस युनिव्हर्स हरनाजचं वजन?
हरनाज कौर संधू हिने मिस यूनिवर्स किताब जिंकून एक मोठा विक्रमच केला होता. कारण तब्बल 21 वर्ष कोणत्याही भारतीय महिलेला हा किताब पटकावता आला नव्हता. त्यामुळेच हरनाज ही आजही चर्चेत आहे. मिस यूनिवर्स किताब पटकावून हरनाजला 3 महिने झाले आहेत. असं असताना आता ती एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये […]
ADVERTISEMENT

हरनाज कौर संधू हिने मिस यूनिवर्स किताब जिंकून एक मोठा विक्रमच केला होता. कारण तब्बल 21 वर्ष कोणत्याही भारतीय महिलेला हा किताब पटकावता आला नव्हता. त्यामुळेच हरनाज ही आजही चर्चेत आहे.
मिस यूनिवर्स किताब पटकावून हरनाजला 3 महिने झाले आहेत. असं असताना आता ती एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती.
पण हरनाजचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिचे चाहते देखील हैराण झाले आहेत.
स्लिम ट्रिम हरनाज हीचं अचानक वजन वाढलेलं दिसतं आहे. तिचा चेहरा देखील काहीसा जाडसर वाटतोय.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर उतरलेल्या हरनाजला काही क्षण तर ओळखता देखील येत नव्हतं.
हरनाजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला ग्लूटेनची अॅलर्जी आहे.
ग्लूटेनची अॅलर्जी असल्याने वजन बरंच वाढतं. बहुदा हरनाजसोबत देखील काहीसं असंच झालं असावं.