‘…तर त्याला रट्टा दिला पाहिजे’, ‘मविआ’च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचं विधान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांबद्दल केलेल्या विधानांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मोर्चा आयोजित केलाय. 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या या मोर्चाचं बच्चू कडू यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केलं आहे. महापुरूषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टे दिले पाहिजे, असं म्हणतानाच संजय राऊतांनी माफी मागावी, अशी मागणी बच्चू कडूंनी केलीये. शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंच्या गटासोबत गेलेले आमदार […]
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांबद्दल केलेल्या विधानांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मोर्चा आयोजित केलाय. 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या या मोर्चाचं बच्चू कडू यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केलं आहे. महापुरूषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टे दिले पाहिजे, असं म्हणतानाच संजय राऊतांनी माफी मागावी, अशी मागणी बच्चू कडूंनी केलीये.
ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंच्या गटासोबत गेलेले आमदार बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाबद्दल बोलताना म्हणाले, ‘महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात मोर्चा काढत असेल तर ते चांगलंच आहे. महापुरुषांबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर त्याला रट्टा दिला पाहिजे,’ असं म्हणत बच्चू कडूंनी थेट चोप देण्याची भाषा केलीये.
महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’ला 13 अटींसह परवानगी, काय म्हटलंय आदेशात?
हे वाचलं का?
बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले, ‘राज्यपालांनी महापुषांबद्दल असं पुन्हा पुन्हा बोलू नये. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी सांभाळून महापुरुषांबद्दल बोललं पाहिजे. उद्याचा महाविकास आघाडीचा मोर्चा ऐतिहासिक आहे,’ असं म्हणत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला अप्रत्यक्षपणे समर्थन दिलंय.
Uddhav Thackeray : महाराष्ट्रासह देशात पुढच्या दारानेच आणीबाणी आणण्याची तयारी
ADVERTISEMENT
संजय राऊतांनी माफी मागावी -बच्चू कडू
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला,’ असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर आमदार बच्चू कडू म्हणाले, ‘संजय राऊत खूप पत्रकार परिषद घेतात. पत्रकारही त्यांना खूप प्रश्न विचारतात. त्यांनी आता चूक दुरुस्ती केली पाहिजे व माफी मागितली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशतील महू गावात झाला, त्या गावात सुद्धा त्यांनी जाऊन आलं पाहिजे,’ असं म्हणत बच्चू कडू यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT