Bachchu Kadu: ‘बच्चू भाऊ गद्दारांबरोबर जायला नको होतं’, कोणी सुनावलं?
MLA Bachchu Kadu: नाशिकः प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) न्यायालयीन कामासंदर्भात नाशिक (Nashik) येथे आले होते त्यानंतर त्यांनी नाशिकमधील ग्रामीण भागात दौरा केला. यावेळी बच्चू कडू हे निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याने (Farmer) दोन एकर कांदा पिकावर मागच्या काही दिवसांपूर्वी रोटर फिरवला होता. त्या शेतकऱ्याची आमदार बच्चू […]
ADVERTISEMENT

MLA Bachchu Kadu: नाशिकः प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) न्यायालयीन कामासंदर्भात नाशिक (Nashik) येथे आले होते त्यानंतर त्यांनी नाशिकमधील ग्रामीण भागात दौरा केला. यावेळी बच्चू कडू हे निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याने (Farmer) दोन एकर कांदा पिकावर मागच्या काही दिवसांपूर्वी रोटर फिरवला होता. त्या शेतकऱ्याची आमदार बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, द्राक्ष निर्याती संदर्भात चर्चा केली. पण यावेळी शेतकऱ्याने एक असं वाक्य म्हटलं की, ज्याने बच्चू कडूंसह सर्वच अवाक् झाले. ‘भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. या गद्दारांबरोबर जायला नको होतं. भाऊ, विधानसभेत तुम्हीच शेतकऱ्यांची बाजू मांडून आम्हा द्राक्ष, कांदा उत्पादकांना न्याय द्या.’ असं विधान शेतकऱ्याने यावेळी केली. mla bachchu kadu you should not have gone with the traitors farmer directly told in nashik
कांद्याला मिळत असलेला कमी भाव व झालेला खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संतापून कांदा उत्पादक शेतकरी अनिल बोरगुडे यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी आपल्या दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरविला होता. त्यानंतर या शेतकऱ्याच्या शेतीला आमदार रोहित पवार, आमदार दिलीपराव बनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या शेतकऱ्यांशी व कुटुंबाशी संवाद साधला होता.
आमदार बच्चू कडू यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात नैताळे येथे रात्री भेट दिली. या भेटीत कांदा पिकावर रोटर फिरविलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. आमदार बच्चू कडू यांनी सवांद साधताना विद्यमान सरकारची पाठराखणत केली.
शेतकरी आपल्या पिकांना हमी भाव न मागता मजुरी म्हणून अनुदान मागू शकता असे ते म्हणाले. ‘भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात. शेतकरी, कष्टकरी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षाने बघतो. तुम्हीच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकता. पण तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं.’ असं विधान यावेळी काही शेतकऱ्यांनी केलं.