आमदार रवी राणांची CM एकनाथ शिंदेंना ऑफर : गरज पडल्यास माझा पक्ष आणि चिन्ह घ्या…

मुंबई तक

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करण्यात आला असल्याने पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण हे पक्षचिन्ह गोठवलं आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असे आदेश आयोगाने दिले आहेत. शनिवारी रात्री उशीरा आयोगाने याबाबतचे आदेश […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करण्यात आला असल्याने पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण हे पक्षचिन्ह गोठवलं आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असे आदेश आयोगाने दिले आहेत. शनिवारी रात्री उशीरा आयोगाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

यासोबतच अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने दोन्ही गटांना तात्पुरते नवीन नावाचे आणि चिन्हांचे पर्याय सुचविण्यास सांगण्यात आले आहे. नाव आणि मुक्त चिन्हांच्या यादींमधील चिन्हांचे आपल्या आवडीनुसार आणि प्राथमिकतेनुसार तीन पर्याय १० ऑक्टोबरपर्यंत आयोगाला कळविणास सांगितले आहे. यानंतर आयोगाकडून दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह देण्यात येणार आहे.

दरम्यान अमरावतीच्या बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गरज पडल्यास त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याची तयारी दर्शविली आहे. रवी राणा यांनी ट्विटरवरून ही ऑफर मुख्यमंत्री शिंदे यांना दिली आहे. त्यांनी म्हटलं की, “शिंदे साहेब गरज पडल्यास माझा पक्ष आणि माझ्या पक्षाचं चिन्ह घ्या. आपल्यासाबोत उभा राहील. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावं.

दरम्यान या ऑफरवर बोलताना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे म्हणाले, आपण कोणाचेही चिन्ह घेणार नाही, कोणी काहीही बडबड करतात. आम्हाला शरद पवार यांच्यासारखा पाठिंबा नको. शरद पवार यांचा शिवसेना संपवण्याचा प्लॅन होता. त्यांच्यासोबत जाऊ नये असं ठाकरे यांना सांगितलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी मविआ सरकार स्थापन केले. अशीही टीका शिवतारे यांनी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp