Santosh Bangar : ‘म्हणून’ प्राचार्यांना केली मारहाण; काय आहेत आरोप?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MLA Santosh Bangar slapped to principal :

ADVERTISEMENT

हिंगोली : येथील तंत्रनिकेतन कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण केल्याने बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) पुन्हा वादात सापडले आहेत. मारहाण करतानाचा त्यांचा व्हीडिओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विरोधी पक्षांकडून आमदार बांगर यांच्यावर कारवाईचीही मागणी होऊ लागली आहे. अशातच या मारहाण प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.(MLA Santosh Bangar slapped to principal video Viral)

तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर महाविद्यालयातील शिक्षिकांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे. “प्राचार्य आमच्यासोबत बोलताना अश्लिल भाषेचा वापर करतात, कार्यालयीन वेळेशिवाय बोलावतात” अशी तक्रार महाविद्यालयाच्या शिक्षिकांनी आमदार बांगर यांच्याकडे केली होती. त्यानंतरच आमदार बांगर यांनी प्राचार्यांच्या दालनात जाऊन त्यांना मारहाण केल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. दरम्यान, या संदर्भात प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी ही घटना १८ जानेवारीला घडल्याचं सांगत यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. सोबतच त्यांच्यावर होत असलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.

हे वाचलं का?

Video : संतोष बांगरांना मतदारसंघात रोखलं; संतापात गावकऱ्याला श्रीमुखात भडकावली!

संतोष बांगर यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांकडून सावध प्रतिक्रिया :

दरम्यान, आमदार बांगर यांचा मारहाण करतानाच व्हीडिओ समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून सावध प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सोडा तो विषय’ म्हणतं या विषयावर बोलणं टाळलं. तर मला त्याबाबत माहिती नसून माहिती घेऊन बोलतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

संतोष बांगर यांचा पुन्हा राडा; संतप्त होऊन विमा कार्यालयाची तोडफोड

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीकडून बांगरांवर कारवाईची मागणी :

दुसऱ्या बाजूला संतोष बांगर यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते लातूर येथे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. प्राचार्य, तहसिलदार, वेगवेगळे अधिकारी यांना मारहाण करणारे आमदार हे आज भारतीय जनता पक्षाच्या बरोबर काम करत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिंदे गट यांच्या सरकारकडून संतोष बांगर यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मागील काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडिया आणि माध्यमांवर प्रदर्शित होताच बांगर यांना अनेकांनी ट्रोल करत जाब विचारला होता. त्यानंतर बांगर यांनी मध्यान्ह भोजन घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवून जेवणाची पाहणी केली. यावेळी डब्यात करपलेल्या पोळ्या, वारणात अळ्या आढळ्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यापाठोपाठ पीक विमा कंपनी कार्यालयात आयोजित बैठकीला अधिकारीच हजर नसल्याचे पाहुन बांगर यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट कार्यालात घुसून साहित्याची मोडतोड केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT