कोल्हापूर : नगरसेवकांना 35-35 लाख दिले, ती चूक झाली; आमदार विनय कोरे यांचा गौप्यस्फोट
कोल्हापूर महापालिकेत जनसुराज्य पक्षाचा महापौर करण्यासाठी एकेकाळी एका-एका नगरसेवकाला 35 लाख रुपये दिले. ती आपली चूक होती, असा गौप्यस्फोट करत आमदार विनय कोरे यांनी केला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नगरसेवकांना एकदा पैसे वाटल्याची कबुली आमदार कोरे यांनी दिली. विधानपरिषद निवडणुकीपासून कोल्हापूर जिल्ह्यात विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या या […]
ADVERTISEMENT
कोल्हापूर महापालिकेत जनसुराज्य पक्षाचा महापौर करण्यासाठी एकेकाळी एका-एका नगरसेवकाला 35 लाख रुपये दिले. ती आपली चूक होती, असा गौप्यस्फोट करत आमदार विनय कोरे यांनी केला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नगरसेवकांना एकदा पैसे वाटल्याची कबुली आमदार कोरे यांनी दिली.
ADVERTISEMENT
विधानपरिषद निवडणुकीपासून कोल्हापूर जिल्ह्यात विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या या अनुषंगाने आमदार विनय कोरे यांनी आज मार्मिक टिपणी केली. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदे आमदार विनय कोरे बोलत होते.
‘लोकशाहीत निवडणुका झाल्या पाहिजेत, पण त्यांचं पावित्र्यही जपलं गेलं पाहिजे. ‘मतदारसंख्या असणाऱ्या निवडणुकीत आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे लोकशाहीचे पावित्र्य जपण्यासाठी बिनविरोध निवडणूक करणं गैर नाही. मर्यादित मतदारसंख्या असणाऱ्या काही वेगळ्या गोष्टी पुढे येतात’, अशी भूमिका त्यांनी मांडली.
हे वाचलं का?
‘कोल्हापूर महापालिकेत जनसुराज्य शक्तीत पक्षाचा महापौर करण्यासाठी नगरसेवकांना प्रत्येकी 35 लाख रुपये दिले होते. राजकीय द्वेषापोटी या गोष्टी कराव्या लागल्या. त्यावेळी करताना काही वाटलं नाही, पण त्याचे जे परिणाम झाले. लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण किंवा राजकीय व्यासपीठाबद्दल सर्वसामान्यांचा दृष्टीकोण बदलला. ती आपली चूक होती’, अशी कबुली आमदार विनय कोरे यांनी यावेळी बोलताना दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी सहा गटाच्या संयुक्त पॅनेलची घोषणा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सहकार्य करावे, असं आवाहन कोरे यांनी केलं. पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विनय कोरे, महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे यांनी ही पत्रकार परिषदेत आयोजित केली होती.
ADVERTISEMENT
‘शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणाऱ्या बाजार समितीमध्ये पक्षीय राजकारण येऊ नये, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह इतर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी आपले अर्ज माघारी घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावं’, असं आवाहन कोरे यांनी केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT