Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांचं पाडवा मेळाव्यातील भाषण जसंच्या तसं

मुंबई तक

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात प्रदीर्घ भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारवर आणि त्यातही शिवसेनेवर अक्षरश: टीकेची झोड उठवली. तसंच मुख्यमंत्र्यांवर देखील अनेक गंभीर आरोप केले. पाहा राज ठाकरे आपल्या भाषणात काय-काय म्हणाले ते जसंच्या तसं… राज ठाकरे यांचं भाषण जसंच्या तसं… “लॉकडाऊन सगळ्यांच्या विस्मरणात गेला. ते चांगलंच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात प्रदीर्घ भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारवर आणि त्यातही शिवसेनेवर अक्षरश: टीकेची झोड उठवली. तसंच मुख्यमंत्र्यांवर देखील अनेक गंभीर आरोप केले. पाहा राज ठाकरे आपल्या भाषणात काय-काय म्हणाले ते जसंच्या तसं…

राज ठाकरे यांचं भाषण जसंच्या तसं…

“लॉकडाऊन सगळ्यांच्या विस्मरणात गेला. ते चांगलंच आहे, पण लॉकडाऊन बरोबरच अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. म्हणून मी फ्लॅश बॅक देऊ असा विचार केला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनाही आपण विसरून गेलो आहोत. २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. माध्यमे दररोज नवनवीन बातम्या देतात आणि तुम्हाला विसरायला होतं. ते तुम्ही विसरता हेच त्यांच्या फायद्याचं आहे.”

“२०१९ मधील विधानसभेची निवडणूक आठवा. भाजप-शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की, अडीच अडीच वर्षाचं ठरलं होतं. आम्हाला तर तुम्ही कधी बोलला नाहीत. सभा घेतल्या, त्यावेळी तुम्ही सांगितलं नाही. मोदींनी सांगितलं भाजपचा मुख्यमंत्री होईल. अमित शाह हेही हेच बोलले, पण तुम्ही काहीही बोलले नाही.”

हे वाचलं का?

    follow whatsapp