PM Modi यांच्या गुजरातमधील अहमदाबादचं नावं मनसेच्या रडारवर; केली मोठी मागणी
महाराष्ट्रातील औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर गुजरातमधील अहमदाबादच नाव बदललं पाहिजे, मनसेची मागणी.
ADVERTISEMENT
मुंबई : महाराष्ट्रातील औरंगाबादचं (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या गुजरातमधील अहमदाबादचं नाव मनसेच्या (MNS) रडारवर आलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर होतं तर गुजरातमधील अहमदाबादचे नाव अहमदाबाद का? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित करत हे नाव बदललं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. (MNS demands renamed of Ahmedabad in Gujarat)
ADVERTISEMENT
गुजरातमधील एका तरुणाने राज ठाकरे यांना मुस्लीम समुदायेच अतिक्रमण हटविण्यासाठी मदतीची विनंती केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार पाटील यांनी ही मागणी केली. अहमदाबादमधील चांडोला तलावावरील मुस्लीम समुदायाच्या अतिक्रमणाबाबत गुजरातमधील तरुणाने राज ठाकरे यांना ट्विट करत मदतीचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : रात्री बारा ते दुपारी बारा, काय-काय घडलं?
या मुद्द्यावर राज ठाकरेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र याबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले, राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर महाराष्ट्रात काही गोष्टी घडत आहेत. त्यामुळे गुजरातमधील या तरुणानेही राज ठाकरे यांना ट्विट करत साद घातली. मात्र त्यापूर्वी माझी पहिली मागणी आहे ती अहमदाबादचं नाव बदलण्याची. कारण औरंगाबादचं संभाजीनगर होतं, तर गुजरातमधील अहमदाबादचे नाव अहमदाबाद का? असा सवाल आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपासून मुस्लीम समुदायाच्या विविध गोष्टींवर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी त्यांनी मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. जर हे भोंगे मशिदीतून हटवले नाहीत तर आम्ही मशिदीबाहेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा त्यांनी दिला होता. याशिवाय ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात माहीममधील समुद्रात बांधलेल्या दर्ग्याच्या बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अवैध बांधकाम पाडण्यात आले.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरात दगडफेक, जाळपोळ; पोलिसांकडून हवेत गोळीबार
यावरून प्रभावित होऊन गुजरातमधील लिंकन सोखाडिया या तरुणाने राज ठाकरे यांना उद्देशून ट्विट केलं. यात संबंधित तरुणाने म्हटलं की, आदरणीय राज ठाकरे जी, हे अहमदाबादमध्ये चांडोला तलाव आहे जो आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता फक्त नाव उरले आहे. येथील निम्मा तलाव अवैध मुस्लीम रहिवाशांनी व्यापला आहे. संपूर्ण गुजरातला हे माहित आहे. एवढेच नाही तर येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात. तसेच अनेक गुन्हेगारांसाठी हे सुरक्षित आश्रयस्थान आहे. येथे एक नाही तर अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत. आजवर गुजरातच्या एकाही नेत्याने याबाबत आवाज उठवला नाही. एक तरी ट्विट करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या अडाणी हिंदूंचे भविष्य वाचेल.
ADVERTISEMENT
हेही वाचा : राम नवमी सोहळा सुरु असतानाच मोठी दुर्घटना; मंदिराच्या विहिरीतच 25 जण बुडाले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT