चिंचवड, कसबा पेठ : भाजपची लढाई सोपी होणार? राज ठाकरेंचं ‘मविआ’ला पत्र
Raj Thackeray letter to MVA। kasba peth and chinchwad bypolls : कसबा पेठ (kasba peth) आणि चिंचवड (chinchwad) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका (bypolls) होत आहे. दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपकडून (BJP) केलं गेलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आता यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) […]
ADVERTISEMENT
Raj Thackeray letter to MVA। kasba peth and chinchwad bypolls : कसबा पेठ (kasba peth) आणि चिंचवड (chinchwad) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका (bypolls) होत आहे. दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपकडून (BJP) केलं गेलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आता यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एन्ट्री झालीये. राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याठी मध्यस्थी केल्याचं दिसत असून, त्यांनी पत्रातून भाजपच्या गेल्या वेळच्या भूमिकेचा दाखला देत महाविकास आघाडीच्या नेत्यांना (MVA Leaders) आवाहन केलंय. त्यामुळे महाविकास आघाडीने माघार घेतली तर भाजपची ही लढाई सोपी होऊ शकते. (Raj Thackeray appeal to Maha vikas Aghadi leader for unopposed elections)
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ज्यात त्यांनी राजकीय संस्कृती, कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपनं घेतलेल्या भूमिकेचा दाखलाही दिला आहे.
चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणूक : राज ठाकरेंनी काय केलंय आवाहन…?
सस्नेह जय महाराष्ट्र,
हे वाचलं का?
महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत.
Bypoll: कसबा, चिंचवडसाठी अखेर भाजपने जाहीर केले उमेदवार, ‘यांना’ दिलं तिकिट
ADVERTISEMENT
मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.
ADVERTISEMENT
कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.
MLC Election : कोकणात भाजपच्या विजयाची ३ कारणं, वाचा सविस्तर
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
जाहीर आवाहन… pic.twitter.com/lDCH44tnk7
— Raj Thackeray (@RajThackeray) February 5, 2023
आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.
-राज ठाकरे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT