संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात वरून सरदेसाईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sandeep Deshpande Attack: मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Baranch) आतापर्यंत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरु आहे. या घटनेत संदीप देशपांडे यांनी पोलीस जबाबात शिवसेना (UBT)चे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या आरोपावर आता शिवसेनेचे युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी उत्तर दिले आहे. (mns sandeep deshpande attack case varun sardesai first reaction)

ADVERTISEMENT

घटनाक्रम काय?

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात 3 मार्चला चार हल्लेखोरांकडून स्टम्पने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संदीप देशपांडे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर त्यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली होती.

संदीप देशपांडे हल्ला: दोघांना भांडूपमधून घेतलं ताब्यात, नेमकं कनेक्शन काय?

हे वाचलं का?

हल्ल्यानंतर संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. या जबाबात संदीप देशपांडे यांनी थेट शिवसेना (UBT)चे नेते वरुण सरदेसाईंवर आरोप केला आहे. आपण मुंबई महापालिकेतील घोटाळे उघड करत असल्यानेच वरुण सरदेसाई यांच्यावर सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी यावेळी केला. देशपांडेच्या या आरोपांवर आता वरूण सरदेसाईने उत्तर दिले आहे.

वरूण सरदेसाई काय म्हणाला?

कसबा विधानसभा निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्याने महाराष्ट्राचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा केलेला प्रकार असल्याचे वरूण सरदेसाईने यांनी म्हटलेय. तसेच या विषयावर मी अधिक बोलणार नाही.महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत,अधिवेशन सुरू आहे, त्यावर चर्चा व्हावी, असे देखील वरूण (Varun sardesai) म्हणाला आहे.

ADVERTISEMENT

वरूण सरदेसाई (Varun sardesai) पुढे म्हणाला, मी आंदोलन दिवसाढवळ्या केली आहेत.लपूनछपून आम्ही काही करीत नाही..जे करायचे ते दिवसाढवळ्या करतो..आम्हाला हल्ला करायची गरज नाही…मी शिवसैनिक आहे, हाडा मासाचा शिवसैनिक आहे. तसेच फुटबॅाल किंवा क्रिकेट मॅच मध्ये मुख्य खेळाडूला टार्गेट केले जाते.. तसेच आदित्य ठाकरे यांना मला टार्गेट केले जात असल्याचे देखील वरूणने म्हटलंय.

ADVERTISEMENT

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन गवळी जेलमधून कायमचा सुटणार? नेमकं ‘ते’ प्रकरण काय?

मी अजून त्यांनी (संदीप देशपांडेने) केलेले आरोप बघितलेले नाहीत. तसचे हल्ल्यातील आमचे कार्यकर्ते असले तरी याच्याशी आमचा संबंध नाही. मुंबई पोलीस दल हे जगातील चांगले दल आहे.ते या प्रकरणाची चौकशी करतील,असे देखील वरूण (Varun sardesai) म्हणालाय.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन हल्लेखोरांची ओळख पटवत त्यांचा शोध घेतला आहे. या दोन हल्लेखोरांना भांडूपमधून ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोरांनी हा हल्ला नेमका कोण्याच्या सांगण्यावरून केला? किंवा या हल्ल्यामागचा नेमका हेतू काय याची पोलीस चौकशी करत आहेत. या आरोपींचा कसून तपास सूरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT