Monsoon News : पुढील ४८ तासात वाढणार वेग, जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होणार
मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी चांगली बातमी आहे. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या सगळ्यांसाठीच ही चांगली बातमी आहे. पावसासाठी (Monsoon) अत्यंत पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील ४८ तासात मान्सूनचा वेग वाढणार आहे. होसाळीकर यांनी काय म्हटलं आहे? नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्व-मध्य […]
ADVERTISEMENT
मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी चांगली बातमी आहे. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या सगळ्यांसाठीच ही चांगली बातमी आहे. पावसासाठी (Monsoon) अत्यंत पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील ४८ तासात मान्सूनचा वेग वाढणार आहे.
ADVERTISEMENT
होसाळीकर यांनी काय म्हटलं आहे?
हे वाचलं का?
नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्व-मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढील ४८ तासांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती आहे.
24/05:
नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्व-मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढील ४८ तासांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती आहे.– IMD☔☔
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 24, 2022
मान्सूनचा प्रवास लांबला आहे, तरीही राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू होती. काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व असल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच पुढील तीन दिवस राज्यात वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची चिन्हं आहेत. कोकण आणि गोव्या येत्या २८ मेपर्यंत काही भागात तुरळक तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातल्या अनेक भागांमद्ये मान्सूनपूर्व पाऊस पडला. पाऊस पडल्याने शेतकरी राजाला दिलासा मिळाल आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. पेरणीपूर्व माशगती शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत असंही दिसून येतं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं कृषीतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
२४ मे रोजी काय घडलं?
नवी मुंबई, मुंबई आणि उपनगरं या ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. तसंच वातावरण ढगाळ झालं होतं. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT