क्रुरतेचा कळस ! दोन महिन्याच्या मुलीची आईकडून हत्या, ओव्हनमध्ये मिळाला मृतदेह
आई आणि मुलाचं नातं हे कधीही शब्दात मांडता येत नाही असं म्हणतात. परंतू अनेकदा आपण जन्मदाती आई आपल्याच मुलाच्या जीवावर उठल्याचं ऐकलं आहे. दिल्लीत असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात जन्मदात्या आईने आपल्या दोन महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आईने आपल्या मुलीची हत्या ही रविवारीच केली होती. परंतू […]
ADVERTISEMENT
आई आणि मुलाचं नातं हे कधीही शब्दात मांडता येत नाही असं म्हणतात. परंतू अनेकदा आपण जन्मदाती आई आपल्याच मुलाच्या जीवावर उठल्याचं ऐकलं आहे. दिल्लीत असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात जन्मदात्या आईने आपल्या दोन महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आईने आपल्या मुलीची हत्या ही रविवारीच केली होती. परंतू घरात कोणाला संशय येऊ नये यासाठी तिने मुलीला बेडवर ठेवत तिच्यासोबत झोपण्याचं नाटक सुरु केलं. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी आई डिंपल (वय २६) हिला मंगळवारी अटक केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर आईने आपल्या मुलीचा मृतदेह ओव्हनमध्ये लपवून ठेवला होता. सोमवारी दुपारी साडेचार वाजता डिंपलच्या घरातल्या लोकांनी दोन महिन्यांचं बाळ हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी यात चौकशीला सुरुवात केल्यानंतर घरातील लोकांचे जबाब नोंदवले. ज्यात मुलीची आई डिंपल, मुलीचे बाबा, मुलीचे काका यांचाही समावेश होता.
हे वाचलं का?
चौकशीदरम्यान पोलिसांना डिंपल पहिल्या मजल्यावर एका खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली. परंतू यानंतर चौकशीत ती आपली तब्येत बिघडल्याचं नाटक करत होती. यानंतर पोलिसांना डिंपलवर संशय येताच त्यांनी कसून चौकशी केली असता ओव्हनमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. ज्यानंतर घरच्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी घरातल्या कोणीही मुलीचा खेळताना किंवा हसता-रडतानाचा आवाज ऐकला नसल्याचं सांगितलं. ज्यावरुन पोलिसांना डिंपलने आपल्या मुलीची हत्या रविवारीच केली असल्याचा संशय आहे. यानंतर संशय येऊ नये म्हणून ती आपल्या मुलीसोबत बेडवर झोपून राहिल्याचं बोललं जातंय.
या हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरीही पोलिसांनी डिंपलला अटक केली आहे. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर या घटनेमागचं सत्य बाहेर येणार आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT