..आता अनंत अंबानींनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी मातोश्रीवर पोहचले होते. अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमागचं कारण समजू शकलेलं नाही.

ADVERTISEMENT

शुक्रवारी रात्री उशिरा अनंत अंबानी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

शुक्रवारी २१ ऑक्टोबर एकीकडे मनेच्या वतीने शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेच्या व्यासपीठावर राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. तर दुसरीकडे रात्री ८.१५ च्या सुमारास अनंत अंबानी हे मातोश्रीवर आले होते. त्यानंतर ते ११ ते ११.३० च्या दरम्यान ते बाहेर पडले. अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

हे वाचलं का?

२१ जूनला शिवसेनेत मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारलं त्यांना साथ लाभली ती ४० आमदारांची. एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं आव्हान उद्धव ठाकरेंना दिलं आहे. शिवसेनेवरही एकनाथ शिंदेंनी दावा सांगितला आहे. या दोघांचा वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. तसंच निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना वेगवेगळं चिन्ह आणि वेगळं नावही दिलं आहे. हा वाद कुठे जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि मनसे हे एकत्र येऊन महाविकास आघाडीला तोंड देताना सध्याच्या राजकारणात दिसत आहेत अशात उद्धव ठाकरे आणि अनंत अंबानी यांची झालेली भेट चर्चेत आहे. ही भेट नेमकी कशासाठी झाली होती ते अद्याप समजू शकलेलं नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT