Mumbai covid : मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ओहोटी?; २४ तासांत १२ रुग्णांचा मृत्यू
आठवडाभरापूर्वी मुंबईत कोरोनानं थैमान घातलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून, मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ओहोटी लागल्याची चिन्हं दिसत आहे. मुंबईत मागील २४ तासांत ६,०३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर याच कालावधीत १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जानेवारीच्या सुरूवातीलाच मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिली. गेल्या आठवड्यात मुंबईत दररोज […]
ADVERTISEMENT

आठवडाभरापूर्वी मुंबईत कोरोनानं थैमान घातलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून, मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ओहोटी लागल्याची चिन्हं दिसत आहे. मुंबईत मागील २४ तासांत ६,०३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर याच कालावधीत १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
जानेवारीच्या सुरूवातीलाच मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिली. गेल्या आठवड्यात मुंबईत दररोज २० हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली होती. त्याचबरोबर पॉझिटिव्ही रेटही वाढला होता. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, मागील काही दिवसांपासून दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याचं दिसत आहे.
नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, Corona Pandemic ची परिस्थिती नियंत्रणात – महापालिकेची हायकोर्टात माहिती
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासांत १८,२४१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्के इतका असून, सक्रिय रुग्णसंख्या ३१ हजार ८५६ इतकी आहे. सध्या मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा कालवाधी ६६ दिवस इतका आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट १.०३ टक्के आहे.