Mumbai Third wave : मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात?; आकडेवारीतून स्पष्ट संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने घातलेलं थैमान आणि निर्बंधांचा फास आवळत असतानाच मंगळवारी समोर आलेली कोरोना रुग्णांची आकेडवारी मुंबईकरांना धडकी भरवणारी आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असून, राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईवरील तिसऱ्या लाटेचं संकट गडद झालं असून, आकडेवारी आणि तज्ज्ञांकडून असेच संकेत मिळत आहेत.

ADVERTISEMENT

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत मंगळवारी (28 डिसेंबर) तब्बल 1,377 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. दीड ते दोन महिन्यानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Omicron संकटादरम्यान भारतात दोन नव्या लसींना मंजुरी, कोणत्या आहेत नव्या लसी?

हे वाचलं का?

आठवडाभरातील ट्रेंड काय?

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आठवडाभराच्या कालावधीपासूनच वाढण्यास सुरूवात झाली. 21 डिसेंबर रोजी मुंबईत 327 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 डिसेंबर रोजी मुंबईत 490 रुग्ण आढळून आले. दररोज कोरोना चाचण्यांची संख्या 40 हजारांच्या आसपास असताना मुंबईतील रुग्णसंख्या मात्र, वाढत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं.

ADVERTISEMENT

21 डिसेंबर रोजी मुंबईत दिवसभरात 37,973 चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर 28 डिसेंबर रोजी 32,369 चाचण्या करण्यात आल्या. मात्र, 28 डिसेंबर रोजी मुंबईत तब्बल 13,77 रुग्ण आढळून आले आहेत. तर दीड ते दोन टक्क्यांच्या आसपास असलेला पॉझिटिव्हीटी रेट मंगळवारी (28 डिसेंबर) तब्बल 4.25 टक्क्यांवर पोहोचला. यामुळे मागील पंधरा दिवसांतील पॉझिटिव्ही रेटची सरासरीही 1.29 टक्क्यांवर पोहोचली आहे.

ADVERTISEMENT

Omicron Threat: तज्ज्ञ म्हणतात.. ओमिक्रॉनमुळे भारतात येईल तिसरी लाट, दररोज 2 लाखांपर्यंत सापडतील रुग्ण!

मुंबईत तिसरी लाट आलीये?

मुंबईत मंगळवारी 13,77 रुग्ण आढळून आल्यानंतर महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी आकडेवारीचं ट्विट करत मुंबईत तिसरी लाट आल्याचे स्पष्ट संकेत आकडेवारीतून मिळत आहेत, असं म्हटलं आहे. ‘संभाव्य तिसरी लाट मुंबईत सुरू झाल्याचं स्पष्टपणे संकेत आकेडवारी मिळत आहेत. परंतु सर्व रुग्णांना सौम्य लक्षणं असून, आतापर्यंत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला नाही. काळजी घ्या’, असं डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये शंशांक जोशी यांनी मुंबईतील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील परिस्थिती अधोरेखित करणारी आकडेवारी पोस्ट केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईत 706 वरून रुग्णसंख्या 1367 होण्यास म्हणजे दुप्पटीचा कालावधी 12 दिवस होता.

तर दुसऱ्या लाटेत 683 वरून 1325 रुग्णसंख्या दुप्पट होण्यास 20 दिवस लागले होते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 683 रुग्णसंख्या अवघ्या 4 दिवसांत 13,77 वर पोहोचली आहे. त्यामुळे एकप्रकारे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे.

लस घेतलेल्या भारतीयांची ‘लॅन्सेट’मधील अभ्यासाने वाढवली चिंता; कोविशिल्डबद्दल समोर आली माहिती

महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचं सावट

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणाकडून प्रयत्न केले जात असतानाच राज्यातील कोरोना रुग्णसंख्येनं उसळी घेतली आहे. राज्यात मंगळवारी 2,172 कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आले आहेत. अचानक झालेल्या रुग्णसंख्या वाढीने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या असल्या, तरी तज्ज्ञांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यांप्रमाणे राज्यात तिसऱ्या लाटेची सुरूवात तर झाली नाहीये ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT