नवाब मलिक Vs समीर वानखेडे: काय आहेत आरोप-प्रत्यारोप? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणाबाबत (Mumbai Cruise Drug Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) कामकाजावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) 8 जणांना एनसीबी टीमने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका लक्झरी क्रूझमधून ताब्यात घेतले होते.

ADVERTISEMENT

यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना अटक करण्यात आली होती. यावेळी आर्यनकडे कोणतेही ड्रग्स सापडले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी NCB विरोधात आघाडी उघडली आहे.

नवाब मलिक यांनी NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, आता समीर वानखेडे देखील स्वतः स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे या दोघांमधील नेमके आरोप-प्रत्यारोप काय आहेत आणि नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊयात सविस्तरपणे.

हे वाचलं का?

नवाब मलिक यांच्या जावयाला अटक

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ही गेल्या वर्षापासून सुरु झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनची जोरदार चर्चा सुरु होती. त्यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अनेक कलाकारांची चौकशी केली होती. चौकशी दरम्यान एका संशयिताने नवाब मलिकचा जावई समीर खानचे घेतले होते.

ADVERTISEMENT

त्या आधारे एनसीबीने त्याला चौकशीसाठी 13 जानेवारीला त्याच्या कार्यालयात बोलावले होते. तेथे समीर खानची अनेक तास चौकशी करण्यात आली. ज्यानंतर समीरला अटक करण्यात आली. समीरच्या अटकेनंतर एका परदेशी नागरिकाला आणि शाहिस्ता फर्निचरवाला या महिलेला देखील अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

समीर खानला जामीन

दरम्यान, तब्बल 8 महिन्यांनंतर समीर खानला या प्रकरणी जामीन मिळाला. 10 जुलै 2021 रोजी NCB ने समीर खान तसेच करण सेजनानी, रहिला, शाहिस्ता फर्निचरवाला, रामकुमार तिवारी, मुच्छड पानवालाचे एक मालक आणि अनुज केशवानी यांच्या विरोधात 1000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी नवाब मलिक हे आपल्या जावयाच्या अटकेबद्दल खूप अस्वस्थ होते. त्याचवेळी त्यांनी एनसीबीवर आपल्या जावयाला बनावट प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला होता.

क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरण

2 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या टीमने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका आलिशान क्रूझवर छापा टाकला. यावेळी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला देखील यावेळी ताब्यात घेतलं होतं ज्यानंतर त्याला अटकही करण्यात आलं.

3 ऑक्टोबर रोजी आर्यनला कोर्टाने 4 ऑक्टोबरपर्यंत रिमांड देण्यात आला होता. त्यानंतर हा रिमांड कालावधी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला होता. यानंतर कोर्टाने आर्यनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याचा मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. या दरम्यान, एनसीबीचे दोन वादग्रस्त साक्षीदार मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांच्याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

किरण गोसावी हा तोच साक्षीदार आहे ज्याचा आर्यनसोबतचा सेल्फी प्रचंड व्हायरल झाला होता. सध्या तो फरार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

NCB सोबत भाजप कार्यकर्ते कसे? मलिकांचा सवाल

आर्यन खानच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी क्रूज ड्रग्स प्रकरणात भाजप कार्यकर्ते मनीष भानुशाली आणि केपी गोसावी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याने क्रूझवर मारलेला छापा देखील बनावट असल्याचे म्हटले होते.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, एनसीबीने त्यांच्या जावयाला गोवले आहे. त्याचप्रमाणे, आर्यन खानलागी क्रूझ ड्रग्स प्रकरणात गोवण्यात आले आहे.

नवाब मलिक यांचे आरोप

या प्रकरणाबाबत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (NCB) निशाणा साधला होता. मलिक यांनी एनसीबीचे साक्षीदार फिक्सर असल्याचा आरोप केला होता. NCB केवळ ठराविक साक्षीदारांद्वारे बनावट छापे मारते. असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर एनसीबीचे अधिकारी अस्वस्थ झाले. पण तरीही त्यांनी यावर फार काही भाष्य केलं नव्हतं.

यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण जस्मिन वानखेडे आणि फ्लेचर पटेल नावाच्या व्यक्तीचे फोटो शेअर करुन काही सवाल उपस्थित केले होते.

फ्लेचर पटेल हा जास्मिन वानखेडेंचा भाऊ असल्याचं म्हटलं जात आहे. पण हाच व्यक्ती एनसीबीच्या अनेक प्रकरणांमध्ये पंच किंवा साक्षीदार कसा काय असतो? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.

ज्यानंतर फ्लेचर पटेल याने स्वत: माध्यमांना अशी माहिती दिली होती की, मला साक्षीदार बनविण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. मी ड्रग्सविरोधात एनसीबीला मदतच करत असतो.

समीर वानखेडेंकडून पोलिसांवर हेरगिरीचे आरोप

दुसरीकडे मुंबईचे एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी याबाबत महाराष्ट्राच्या डीजीपीकडे तक्रारही केली होती. मात्र, त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळल्याचे दिसून आले.

समीर वानखेडे यांच्या आईचे 2015 मध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ते दररोज कबरस्तानमध्ये जातात. इथे देखील आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं त्यांनी आरोप केला होता. ज्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली.

सेलिब्रिटींना अडकवून वसुलीचा आरोप

अलीकडेच, नवाब मलिक यांनी पुन्हा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी सेलिब्रिटींना ड्रग्सच्या बनावट प्रकरणात अडकवले आणि नंतर त्यांच्याकडून खंडणी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मलिक यांनी केला.

मालदीव आणि दुबईला कशासाठी गेले होते समीर वानखेडे?

नवाब मलिक यांनी वानखेडेंवर निशाणा साधताना आणि म्हटले की, टसमन्स बजावण्यात आलेले सेलिब्रिटी हे मालदीवमध्ये होते तेव्हा समीर त्यांच्याकडून पैसे गोळा करायला गेला होते का? याचे उत्तर त्यांनी द्यावं, कारण ते देखील त्याचवेळी मालदीव आणि दुबईमध्ये होते.’

समीर वानखेडेंनी मलिकांचा आरोपांना काय दिलं उत्तर?

मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी ‘आज तक’शी संवाद साधताना नवाब मलिक यांच्या आरोपांवर असं म्हटलं होतं की, “माझा मुद्दा असा आहे की नवाब मलिक चुकीचे बोलत आहेत. मी मुलांसह मालदीवला गेलो होतो. या घाणेरड्या आरोपांना मला काहीही उत्तर द्यायचं नाही. माझ्या कुटुंबावर हल्लाबोल केला जात आहे. बहीण आणि वडिलांबाबत आरोप केले जात आहेत. अंमली पदार्थांविरुद्ध लढण्यासाठी आम्ही कारवाई करतच राहू. याशिवाय देखील अनेक आरोप केले जात आहेत, आम्ही याबाबत कायदेशीर मदत घेऊ.’

खळबळजनक! ‘समीर वानखेडेंना अडथळा निर्माण करू नका, अन्यथा…; नवाब मलिकांना धमकी

नवाब मलिकांचा दावा – ‘समीरची नोकरी एका वर्षात जाईल’

ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडेवर वारंवार हल्ला करणाऱ्या नवाब मलिक यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करून गंभीर आरोप केले होते. मलिक यांनी आरोप केला होता की, समीर वानखेडेने सेलिब्रिटींना बनावट ड्रग्स केसेसमध्ये अडकवले होते आणि नंतर त्यांच्याकडून खंडणी घेण्याचा प्रयत्न केला होता.

मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना आव्हान देत असं म्हटलं होतं की, ‘ते (समीर) एका वर्षात नोकरी गमावतील. ते आम्हाला तुरुंगात टाकण्याचे स्वप्न पाहत आहेत पण लोकं त्यांनाच तुरुंगात पाहतील.’

नवाब मलिकांना धमकी

दरम्यान, नवाब मलिक यांनी शुक्रवारी असा दावा केला की, त्यांना NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टार्गेट करू नये म्हणून फोनवर सतत धमक्या येत आहेत. या कथित धमकीनंतर नवाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी सांगितले की, हा फोन राजस्थानमधून आला होता. तो पोलीस ऑपरेटरने उचलला. त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT