Mumbai Cyclone Tauktae: चक्रीवादळाचा गंभीर परिणाम, मुंबईत कोसळधार; सी लिंक, मोनो रेल्वे बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Cyclone Tauktae या चक्रीवादळाचा मुंबईवर अत्यंत गंभीर परिणाम पाहण्यास मिळाला आहे. मुंबईमध्ये जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सकाळपासूनच आहे. एवढंच नाही तर सी लिंकही बंद करण्यात आला आहे. एअरपोर्टही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये या वादळाचा गंभीर परिणाम दिसून आला. ठाणे, पालघर या जिल्ह्यांनाही काही प्रमाणात फटका बसला. तर रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

मुंबई उपनगरांचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही हे सांगितलं की मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठणार नाही ना? याकडे लक्ष दिलं जातं आहे. जेवढंही नुकसान झालं आहे त्याचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रपणे काम करतं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आज दिवसभरात काय काय घडलं?

ADVERTISEMENT

सोसाट्याचा वारा सुटल्याने मुंबईतल्या घाटकोपर-विक्रोळीच्या दरम्यान लोकल ट्रेनवर झाडाच्या फांद्या पडल्या. त्यामुळे काही काळासाठी मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. सावधगिरीचा इशारा म्हणून काही ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली त्यानंतर पूर्ववत करण्यात आली.

ADVERTISEMENT

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घटल्या. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया या सुप्रसिद्ध वास्तूजवळ असलेल्या रस्त्यांवरही पाणी जमा झालं.

हवामान विभागाने महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ आणि वातावरणात अचानक झालेले बदल या सगळ्यासाठी राज्याच्या प्रमुख किनाऱ्यांवर एनडीएआरएफची पथकंही तैनात करण्यात आली. लोकांनी अकारण घराबाहेर पडू नये, पडलात तरीही समुद्राजवळ मुळीच जाऊ नये असाही इशारा देण्यात आला.

मुंबईत Tauktae चक्रीवादळामुळे काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या दरम्यान ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतल्या सी लिंकवरची वाहतूकही खबरदारीचा उपाय म्हणून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली असून मुंबईकरांना पर्यायी मार्ग वापरण्याची सूचना देण्यात आली आहे.

मुंबईत सकाळपासूनच कोसळधार आहे. चक्रीवादळामुळे सी लिंक पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सकाळीच झाला आहे.मुंबईत पाच ठिकाणी शेल्टर्स होमही तयार करण्यात आले आहे. पश्चिम मुंबईत NDRF ची तीन पथकं आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाची 6 पथकंही तैनात करण्यात आली आहेत. मुंबईत चक्रीवादळामुळे मोनो रेल्वेची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 11 तासांसाठी ही सेवा बंद असणार आहे. तर मुंबईतून काही विमानानंची उड्डाणं रद्द करण्यात आली तर काहींची मार्ग बदलण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातही परिणाम

या चक्रीवादळाचा परिणाम हा आता मध्य प्रदेशातही दिसू लागला आहे. मध्यप्रदेशातल्या काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला आहे. भोपाळ, होशंगाबाद, रायसेन, शहडोल, मंदसौर, कटनी, रतलाम, छतरपूर आणि खंडवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाला आहे. भोपाळ येथील हवामान विभागाने उज्जैन, इंदूर, भोपाळ, जबलपूर, सागर, शहडोल, ग्वाल्हेर, सतना आणि रिवा या जिल्ह्यांमध्ये हलक्या आणि मध्यम सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला हे.

उत्तराखंडमध्ये हाय अलर्ट

हवामान विभागाने उत्तराखंडमध्येही 18 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच 19 आणि 20 मे या दोन दिवशी मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त करत रेड अलर्टही दिला आहे. देहरादून, उत्तर काशी, चमौली, रूद्रप्रयाग आणि पिथौरगढ या ठिकाणी हा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT