Kishori Pednekar: “एकनाथ शिंदेंच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांनीच लिहून दिली”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला तर उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या दोन्ही मेळाव्यांची चर्चा अद्यापही संपलेली नाही. अशात आता दोन्ही भाषणांवर दोन्हीकडून टीका होते आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका केली जाते आहे. तर भाजपकडून उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली जाते […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला तर उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या दोन्ही मेळाव्यांची चर्चा अद्यापही संपलेली नाही. अशात आता दोन्ही भाषणांवर दोन्हीकडून टीका होते आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका केली जाते आहे. तर भाजपकडून उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली जाते आहे. किशोरी पेडणेकर यांनीही एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट संघ आणि भाजपने लिहून दिल्याचा आरोप केला आहे. तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाल्या आहेत किशोरी पेडणकेर?
आमच्या दसरा मेळाव्यातलं उद्धव ठाकरेंचं भाषण हे स्क्रिप्ट नव्हतं. तर तो जनतेशी संवाद होता. खरं स्क्रिप्ट कुणाचं आहे ते बाहेर आलं आहे. आम्ही सगळे एकनाथ शिंदे यांना ओळखतो. हे शिंदे साहेबांचं भाषण नव्हतं तर देवेंद्र फडणवीस यांनीच ते लिहून दिलं होतं. उद्धव ठाकरे जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांना सगळे प्रतिसाद देत होते. मात्र बीकेसीत एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू झालं तेव्हा लोकं उठून जात होते हे आम्ही टीव्हीवर पाहिलं. अशीही टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
हे वाचलं का?
बाळासाहेब ठाकरे यांचं शिंदे गटाकडून मार्केटिंग
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मार्केटिंग शिंदे गटाने केलं गेलं. त्याआधीही केलं गेलं. आता शिवसेना संपली असं बोललं गेलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे की जे कोणी शिवसेना सोडून जातात त्यांच्यामुळे पक्ष संपत नाही. एक पोस्टर काल शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात आणलं गेलं त्यात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नव्हता. चूक लक्षात आल्यावर लगेच दुसरं पोस्टर आणण्यात आलं. एकनाथ शिंदे वाचून बोलत होते आणि ते स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिलं होतं.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणखी काय आरोप केला?
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात दारूच्या बाटल्या होत्या. असा गंभीर आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. एवढंच नाही तर स्टेजवर बसलेल्या दीपक केसरकर यांना झोप लागली होती असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यांतर बीकेसी मैदानावर कचरा जमा झाला होता. हा कचरा पाहिला तर आयोजकांवर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न मला आयोजकांना विचारायचा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT