“ज्या मुलीने १३ व्या वर्षी घाणेरड्या सिनेमातून प्रसिद्धी मिळवली…” नवनीत राणांवर किशोरी पेडणेकरांची टीका
ज्या मुलीने १३ व्या वर्षी घाणेरड्या सिनेमातून प्रसिद्धी मिळवली तिच्याबद्दल आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणांवर टीका केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. “एकही महिला लायक नाही का?” शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारानंतर किशोरी पेडणेकरांचा सवाल काय म्हटलं आहे […]
ADVERTISEMENT
ज्या मुलीने १३ व्या वर्षी घाणेरड्या सिनेमातून प्रसिद्धी मिळवली तिच्याबद्दल आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणांवर टीका केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
ADVERTISEMENT
“एकही महिला लायक नाही का?” शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारानंतर किशोरी पेडणेकरांचा सवाल
काय म्हटलं आहे किशोरी पेडणेकर यांनी?
अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर राणा दाम्पत्याने गंभीर आरोप केले आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता, किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “त्या बाईबद्दल आम्ही कुणीही काहीही बोलणार नाही. ज्या बाईने वयाच्या १३ व्या वर्षी घाणेरड्या सिनेमातून प्रसिद्धी मिळवली त्याबाबत आम्ही काय बोलणार? आम्ही घरंदाज बायका आहोत त्या बाईवर आम्ही बोलणार नाही.” असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
हे वाचलं का?
लव्ह जिहाद : तरुणीच्या आरोपामुळे पोलिसांवर आगपाखड करणाऱ्या नवनीत राणा पडल्या तोंडघशी?
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांवर टीका केली. तसंच एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या वादाविषयी आपण न्याय मागणार आहोत असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत जाहीर आव्हान दिलं होतं. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. तू ठाकरे है तो मै भी राणा हूँ. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल पण विदर्भाची सून आहे. आमना-सामना तर लवकरच होईल मग कळेल की कोण किती ताकदवान आहे असंही नवनीत राणा म्हणाल्या होत्या.
ADVERTISEMENT
काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर म्हणजेच मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार राणा दाम्पत्याने म्हणजेच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केला होता. त्यावरून राज्यात राडा झाला होता. त्यानंतर नवनीत राणा विरूद्ध उद्धव ठाकरे असा सामना पाहण्यास मिळाला. आज मात्र किशोरी पेडणेकर यांनी आम्ही घरंदाज बायका तिच्याबद्दल बोलणार नाही असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबाबत काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
एकनाथ शिंदे यांचा अनुभव आम्ही चांगला घेतला आहे. ते खरंच शब्द पाळणारे होते. २३६ वॉर्ड करणारे तुम्हीच. आता ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात त्यानंतर २२७ कसे केले? एकनाथ शिंदे शब्द पाळणारे होते. आता नुसते नावाचे शिवसैनिक आहेत असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT