Mumbai Goa Expressway accident : 2 भयंकर अपघात, 14 प्रवासी जागीच ठार

मुंबई तक

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात झाले. पहिल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, 23 प्रवासी जखमी झाले. पहिला अपघात ट्रक आणि इको कारचा झाला, तर दुसरा अपघात खासगी बसचा झाला आहे. रायगड : इको आणि ट्रकचा भीषण अपघात 9 जण जागीच ठार, बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू मुंबई गोवा महामार्गावर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात झाले. पहिल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, 23 प्रवासी जखमी झाले. पहिला अपघात ट्रक आणि इको कारचा झाला, तर दुसरा अपघात खासगी बसचा झाला आहे.

रायगड : इको आणि ट्रकचा भीषण अपघात 9 जण जागीच ठार, बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, गुरुवारी (19 जानेवारी) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव हद्दीत पहाटे 4 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास मौजे रेपोली येथे भीषण अपघात झाला.

लोटे एमआयडीसीकडून मुंबईकडे जाणारा ट्रक (MH 43 U 7119) आणि मुंबईकडून हेदवी गुहागर येथे जाणारी इको कार (MH 48 BT 8673) या दोन्ही वाहनांची जोराची धडक झाली. धडक इतकी भयानक होती की, त्यामध्ये ईको गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातामध्ये इको गाडीतील पाच पुरुष व तीन महिला व एका लहान मुलीचा अशा एकूण 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. एक बालक जखमी झाला होता. दुर्दैवाने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?