रिलीजपूर्वी गंगूबाई काठियावाडी सिनेमा ‘या’ कारणाने अडचणीत

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गूंगाबाई काठियावाडी सिनेमाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने सिनेमासंदर्भात समन्स बजावला आहे. गंगूबाई सिनेमातील मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि 2 लेखकांना हा समन्स बजावण्यात आलाय.

ADVERTISEMENT

या सिनेमातील मुख्य पात्र गंगूबाई यांचा दत्तक मुलगा बापू रावजी शाह यांनी कुटुंबाची बदनामी होण्याचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केलीये. शहा यांच्या म्हणण्याप्रमाणे, यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या असून यामुळे गंगूबाई यांच्या कुटुंबाची बदनामी होतेय. या याचिकेनंतर कोर्टाने सर्वांना 21 मे रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर सिनेमाचं शूटींग थांबवण्यात आलं होतं. मात्र आता संजय यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर आलिया भट्ट स्टारर असलेल्या गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या शूटींगला सुरुवात होणार आहे.

हे वाचलं का?

येत्या 30 जुलै रोजी गंगूबाई काठियावाडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया भट्ट या सिनेमात एका लेडी डॉनची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकाप्रमाणे गंगूबाई गुजरातमधील कठियावाडमध्ये राहणारी होती. म्हणूनच तिला गंगूबाई काठियावाडी या नावाने ओळखलं जात होतं. गंगूबाईचा मुंबईतील कामाठीपुरा परिसरात वैश्या व्यवसाय चालत होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT