मुंबईत लोकलमध्ये चढताना तोल गेल्याने प्रवासी खाली कोसळला आणि…. थरार सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन असं म्हटलं जातं. मात्र याच लोकलमध्ये अपघातही होतात. लोकल ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवासी पडून ते जखमी झाल्याचा किंवा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. सेंट्रल रेल्वेनेच हा व्हीडिओ ट्विट केला आहे. एक प्रवासी लोकल ट्रेनमध्ये चढत असतानाचा त्याचा तोल गेला. त्यामुळे तो खाली पडला. लगेच प्रवासी धावले आणि त्याला वाचवलं.

ADVERTISEMENT

डोंबिवली : ट्रेन पकडताना तोल गेला, ट्रॅक खाली जाणाऱ्या महिलेला दोन जवानांनी वाचवलं

या प्रवाशाचा व्हीडिओ व्हायरलही झाला आहे. मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकातला असल्याचं समोर आलं आहे. प्रवाशांना नेहमीच घाई न करता ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचं किंवा ट्रेनमधून खाली उतरण्याचं आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत असतं. मात्र, असे असतानाही अनेकदा नागरिक घाई करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात तसाच हा प्रकार आहे.

हे वाचलं का?

लोकल ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात हा प्रकार घडला. सुदैवाने स्टेशनवर उपस्थित असलेल्या तिकीट तपासनिसाने आणि इतर प्रवाशांनी धावून या प्रवाशाला बाजूला खेचलं. TC आणि प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

वरिष्ठ तिकीट तपासनीस असलेले नागेंद्र मिश्रा हे नेहमीप्रमाणे आपले कार्य करत होते. ते ज्या प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणीसचं काम करत होते. त्यावेळी प्लॅटफॉर्म शेजारी एक लोकल ट्रेन आली. या लोकलमध्ये एक प्रवासी घाईने चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी नेमका त्याचा तोल गेला आणि खाली कोसळला. नागेंद्र मिश्रा यांनी हा प्रकार पाहिला आणि तातडीने त्या प्रवाशाच्या मदतीला धाव घेतली. नागेंद्र मिश्रा यांनी इतर प्रवाशांनी त्या प्रवाशाला लोकल ट्रेनपासून दूर खेचले आणि त्याचे प्राण वाचवले.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारी एक महिला खाली कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांपैकी एकाने त्या महिलेचा जीव वाचवला. मुंबईतील सँडहर्स्ट रेल्वे स्थानकावर ही घटना घडली होती. ट्रेनमध्ये चढताना एक 50 वर्षीय महिला खाली कोसळली होती. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला होता. त्या व्हिडीओत दिसत होते की, एक 50 वर्षीय महिला कशाप्रकारे ट्रेनमध्ये चढताना खाली कोसळली. त्यावेळी तेथे कार्यरत असलेल्या आरपीएफ जवानांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्या महिलेचे प्राण वाचवले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT