डिझायनर मास्कवरून अजित पवारांच्या सूचना, किशोरी पेडणेकरांचा शुक्रवारी मॅचिंग मास्क, शनिवारी N95 मास्क
डिझायनर मास्कवरून उपमुख्यंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. नागरिकांनी डिझायनर मास्कच्या ऐवजी N95 मास्क वापरावा असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अनेक नागरिक N95 मास्क वापरत नाहीत डिझायनर मास्क वापरतात त्यामुळे पुरेशी सुरक्षा आपल्याला मिळते. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्याचं शुक्रवारचं उत्तर आणि शनिवारची कृती दोन्ही […]
ADVERTISEMENT
डिझायनर मास्कवरून उपमुख्यंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. नागरिकांनी डिझायनर मास्कच्या ऐवजी N95 मास्क वापरावा असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अनेक नागरिक N95 मास्क वापरत नाहीत डिझायनर मास्क वापरतात त्यामुळे पुरेशी सुरक्षा आपल्याला मिळते. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्याचं शुक्रवारचं उत्तर आणि शनिवारची कृती दोन्ही वेगवेगळ्या होत्या.
ADVERTISEMENT
AIIMS ने सांगितली ओमिक्रॉनची पाच धोकादायक लक्षणं, दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा
शुक्रवारी काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
हे वाचलं का?
‘मी लावलेला मास्क तीन लेअर असलेला आहे. श्वसनासाठी योग्य आहे. मी एक महिला आहे, वय वाढलं तरी सौंदर्य किंवा छान राहणं मला आवडतं. अजित पवार म्हणाले असतील की डिझायनर मास्क वापरू नका मात्र मला असा मास्क वापरणं आवडतं. मॅचिंग करणंही आवडतं. माझा मास्क कॉटनचा आहे तो धुतला जातो आणि वापरलाही जातो. अजित पवार यांनी जे सांगितलं की N95 मास्क लावा त्यात थोडा बदल करू. N95 मास्क थोडा महाग आहे. मी सामान्य जनतेचं नेतृत्व करते. सामान्य जनतेला काय परवडेल याचं मी उदाहरण राहिले तर लोकही तसं करतील. महिला असल्याने एक सुप्त गुण असतो सगळ्यांना मॅचिंग हवं असतं. मलाही ते आवडतं. माझं या मास्कमुळे संरक्षण होतं.’ असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी म्हटलं होतं.
अजित पवार कानीकपाळी ओरडून सांगत होते मास्क लावा, ज्यांनी लावला नाही त्या सगळ्यांना झाला कोरोना
ADVERTISEMENT
आज जेव्हा किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पत्रकारांचं आणि कॅमेराचं लक्ष वेधलं गेलं ते त्यांच्या N95 मास्ककडे. आज किशोरी पेडणेकर यांनी N95 मास्क घातला होता जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. शुक्रवारी मॅचिंगचं महत्त्व सांगणाऱ्या तसंच माझ्या मास्कमुळे माझं संरक्षण होतं म्हणणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी आज त्यांच्या हौसेला मुरड घातल्याचं दिसून आलं. मुंबई शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
अशात शनिवारी सकाळी महापौरांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी किशोरी पेडणेकर यांच्या N95 मास्ककडे सगळ्यांचं लक्ष गेलं. किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी आवड बोलून दाखवली आणि शनिवारी N95 हा तसा रूक्ष दिसणारा मास्क घातला त्यामुळे या मास्कची चांगलीच चर्चा होते आहे.
ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे देशभरासह राज्यात आरोग्य यंत्रणांसमोरची चिंता आता वाढत चालली आहे. मुंबईत शुक्रवारी 20 हजारांच्या घरात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असताना राज्यभरात ही संख्या 40 हजार 925 वर पोहचलेला आहे. राज्यात रुग्णसंख्येत वाढ जरी झालेली असली तरीही कोणालाही ओमिक्रॉनची लागण झालेली नसल्याचं समोर येतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT