भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा बांगलादेशी अध्यक्ष अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबई पोलिसांनी भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या उत्तर मुंबई प्रमुखाला अटक केल्यानंतर काँग्रेसने याबाबत आता जोरदार टीका केली आहे. रूबेल जोनू शेख असं या अटक करण्यात आलेल्या भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या उत्तर मुंबई अध्यक्षाचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेला रुबेल शेख हा मुळात एक बांगलादेशी नागरिक असून तो खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत आहे. यावरुनच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्याच्या अटकेनंतर सचिन सावंत यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘आता आम्ही हा प्रश्न विचारतो की हा भारतीय जनता पक्षातर्फे संघ जिहाद आहे का?’ असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे?’

ADVERTISEMENT

सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

“भाजपमधले काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले आहेत. काही पदाधिकारी हे पाकिस्तानच्या आयएसआयचे एजंटही होते. आता भारतीय जनता पार्टीची प्रगती याच्याही पलिकडे झाली आहे. उत्तर मुंबईचा भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रूबेल शेख हा बांगलादेशीच निघाला. आता आम्ही हा प्रश्न विचारतो की हा भारतीय जनता पक्षातर्फे संघ जिहाद आहे का? दुसरीकडे CAA मध्ये भाजपसाठी काही वेगळी तरतूद करण्यात आली आहे का? याचं उत्तर भाजपच्या देशपातळीवरच्या नेत्यांनी द्यावं. भाजपमध्ये वाल्याचा वाल्मिकी होतो, ही नवीन पद्धत भाजपने सुरू केली आहे.” असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

आरोपी रुबेल शेख याला मागील आठवड्यातच मुंबई पोलिसांनी अटक केली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक भालेराव शेखर यांनी अशी माहिती दिली की, ‘आम्ही आरोपीला अटक केली आहे. सुरुवातीला त्याने काही खोटे कागदपत्र पैसे देऊन मिळवले आणि त्यानंतर त्याने त्याच आधारे आपलं स्वत:चं पॅन कार्ड आणि आधारकार्ड बनवलं होतं. दरम्यान, आरोपी सध्या न्यायलयीन कोठडीत आहे.

ADVERTISEMENT

ही बातमी आपण पाहिलीत का?: आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली, सेलिब्रिटींच्या नाही-काँग्रेस

ADVERTISEMENT

पोलीस अधिकाऱ्यांनुसार रुबेल शेख हा बांगलादेशच्या जसूर जिल्ह्यातील बोवालिया गावातील रहिवासी आहे. रुबेल याने 2011 साली भारतात कोणत्याही कागदपत्रांशिवाय घुसखोरी केली आहे. दरम्यान, आरोपीने यथावकाश भाजप पक्षासाठी काम सुरु केलं आणि नंतर तो भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या उत्तर मुंबईचा प्रमुख देखील झाला. पण रुबेल जी कागदपत्रं तयार केली होती ती खोटी असल्याचं आता समोर आलं आहे.

जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना त्याच्या घरातून मलापोटा ग्रामपंचायत, हंसखली येथील जन्मदाखला आणि नादिया जिल्ह्यातील शाळा सोडल्याचा दाखला देखील सापडला. ही सगळी ठिकाणं पश्चिम बंगालमधील आहेत. पण जेव्हा पोलिसांनी या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा हे सगळे कागदपत्र खोटे असल्याचं समोर आले. संबंधित कलेक्टर कार्यालयात अशा कोणत्याही कागदपत्रांची माहिती आढळून आली नाही. त्यामुळे रुबेलचे हे सगळे कागदपत्र खोटे आणि बनावट असल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान, आता पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता याबाबत भाजप नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT