मार्शल्स आणि नागरिकांमध्ये विनामास्क कारवाईवरून तू तू मैं मैं
मुंबईतल्या धारावी भागातली, विना मास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाईसाठी मुंबई महापालिकेने शहरात मार्शलची नेमणूक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई कडक केली असून,मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. मात्र ही कारवाई करताना महानगरपालिकेचे हे मार्शल्स आणि नागरिकांमध्ये वादावादी होण्याचं चित्र मोठ्या प्रमाणावर शहरात […]
ADVERTISEMENT
मुंबईतल्या धारावी भागातली, विना मास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाईसाठी मुंबई महापालिकेने शहरात मार्शलची नेमणूक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई कडक केली असून,मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. मात्र ही कारवाई करताना महानगरपालिकेचे हे मार्शल्स आणि नागरिकांमध्ये वादावादी होण्याचं चित्र मोठ्या प्रमाणावर शहरात दिसून येतंय.धारावी हा विभाग लॉकडाऊनमध्ये मुंबईतील रेड झोनमध्ये होता. सर्वात जास्त रूग्ण याच विभागात सापडले होते. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने मार्शल्सची संख्याही दुप्पट केलीय. रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या थांबवून त्यातील नागरिकांनी जरी मास्क घातलं नसेल तर त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे काही नागरिक आणि मार्शल्समध्ये चुकीच्या पध्दतीनेदंड वसूल करण्यावरून वादावादी पर्यायाने याचं रूपांतर मारामारीत होण्याच्या काही घटनाही मुंबईत घडल्या आहेत. त्यामुळे या मार्शल्सनाही अनेक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
मास्कचा योग्यरित्या उपयोग न करणाऱया तसेच सार्वजनिक जागी थुंकणाऱया नागरिकांवर कारवाई करण्यासाठी मुंबईत सध्या कार्यरत असलेल्या २,४०० मार्शल्सची संख्या दुपटीने वाढवून ती ४,८०० इतकी करण्यात आलीय. विना मास्क फिरणाऱयांवर जरब बसवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सध्या होत असलेली सरासरी १२ हजार ५०० नागरिकांवरील कारवाईची संख्या वाढवून दररोज संपूर्ण मुंबईत मिळून किमान २५ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे आदेश महानगरपालिकेने दिलेले आहेत. मात्र काही ठिकाणी कारवाईची संख्या वाढवण्याच्या नादात मार्शल्स आणि नागरिकांमध्ये तू तू मै मै ची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्शल्सनाही किमान २५ हजार नागरिकांवर कारवाई करण्याचं टारगेट असल्याने छोट्या छोट्या गोष्टींचे पालन न करणाऱ्या नागरिकांनाही मार्शल्सनी आपलं टारगेट केलं आहे. आणि यामुळेच नागरिकांमध्ये आणि मार्शल्समधले वादावादीचे प्रसंग वाढले आहेत.. महाराष्ट्रातील इतर भागात कोरोनाने डोकं वर काढल्याने मुंबई महापालिकेने नियम कडक केले आहेत. पण कारवाईच्या नादात मुंबईत मार्शल्स विरूध्द नागरिक असंच चित्र सध्या वाढू लागलंय. त्यामुळेमास्क घालणं गरजेचं आहेच, नियम पाळणं गरजेचं आहेच ही जशी मुंबईकरांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे कारवाई करताना मार्शल्सनी ती जुलमी पद्धतीने न करता योग्य ती खबरदारी घेऊन करावी अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT