नागपूर : हवाला व्यावसायिकांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; पोलिसांचं धाडसत्र, २०० लॉकर सील

मुंबई तक

नागपूर शहरात अवैधपणे सुरू असलेल्या हवाला व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी एकाच वेळी नऊ ठिकाणी धाडी टाकत हवाला व्यावसायिकांची झोप उडवून दिली. नागपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत ८४ लाखांची रोकड जप्त केली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर 200 लॉकर सील करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. नागपूर : घरगुती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नागपूर शहरात अवैधपणे सुरू असलेल्या हवाला व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी एकाच वेळी नऊ ठिकाणी धाडी टाकत हवाला व्यावसायिकांची झोप उडवून दिली.

नागपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत ८४ लाखांची रोकड जप्त केली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर 200 लॉकर सील करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.

नागपूर : घरगुती वादातून ४ महिन्यांच्या बाळासह पत्नीला चालत्या बाईकवरुन ढकललं

पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईत एकाच वेळी नऊ हवाला व्यावसायिकांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश चेंबरसह अन्य ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?