सरण पेटवताना तिघे होरपळले, दोघांचा मृत्यू; नागपुरातील घटना
-योगेश पांडे, नागपूर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये अंत्यसंस्कारावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पार्थिवाला अग्नी देताना आगीचा भडका उडाल्याने ही घटना घडली. अंत्यसंस्कारासाठी (सरण) चिता पेटवताना आगीची भडका झाल्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिघे जण भाजले. आगीच्या लोळांनी होरपळून तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे […]
ADVERTISEMENT

-योगेश पांडे, नागपूर
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये अंत्यसंस्कारावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पार्थिवाला अग्नी देताना आगीचा भडका उडाल्याने ही घटना घडली.
अंत्यसंस्कारासाठी (सरण) चिता पेटवताना आगीची भडका झाल्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिघे जण भाजले. आगीच्या लोळांनी होरपळून तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली आहे.
दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.