नाना पटोले : “गुजरात दंगलीवेळी अटलबिहारी वाजपेयींनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होतं”

मुंबई तक

–योगेश पांडे, नागपूर “काँग्रेस नेते स्व. अहमद पटेल यांच्यावर भाजपने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. २००२ च्या गुजरात दंगलीने नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गुजरात दंगलीवेळी राजधर्माचे पालन केले नाही म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होते. गुजरात दंगलीचे हे पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर भाजपकडून गलिच्छ आरोप […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

“काँग्रेस नेते स्व. अहमद पटेल यांच्यावर भाजपने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. २००२ च्या गुजरात दंगलीने नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गुजरात दंगलीवेळी राजधर्माचे पालन केले नाही म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होते. गुजरात दंगलीचे हे पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर भाजपकडून गलिच्छ आरोप केले जात आहेत,” अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

गुजरात एसआयटीने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अहमद पटेल आणि तिस्ता सेटलवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, “गुजरात दंगल हाताळण्यात नरेंद्र मोदी सरकार सक्षम नव्हते व त्या सरकारची तशी इच्छाही नव्हती हे दिसून आले आहे. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या नरसंहारांने भारताची जगात नाच्चकी झाली. हे पाप नरेंद्र मोदी यांची पाठ सोडत नाही व सोडणार नाही. पण आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात ते विरोधकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत.”

“सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांना छळण्याचा, त्यांना त्रास देण्याच्या मोदी-शाह यांच्या षडयंत्राने मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही सोडलेले नाही. मृत्यूनंतरही त्या व्यक्तीवर आरोप करण्याचे भाजपचे गलिच्छ राजकारण दर्शवते तसेच मयत व्यक्ती या आरोपांचे उत्तर देऊ शकत नाही हे माहित असूनही भाजपकडून हीन राजकारण केले जात आहे,” असं नाना पटोले म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp