शिंदे-ठाकरेंचे शिवसैनिक भिडले! शिंदे गटातील नेत्याच्या मुलाकडून गोळीबार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nashik crime news : शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्यापासून ठाकरे गट (Thackeray faction) आणि शिंदे गटात (Shinde faction) सातत्यानं संघर्षाच्या ठिणग्या पडताना दिसत आहे. नाशिकमध्येही (nashik) असाच प्रकार घडला आहे. नाशिकमधील देवळाली (deolali gaon) गाव परिसरात गुरूवारी सायंकाळी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये (Shiv Sainik) जोरदार राडा झाला. या दरम्यान शिंदे गटातील माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे (surykumar lavte) यांच्या मुलाने हवेत गोळीबार केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

सप्टेंबर 2022 मध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वाद झाल्यानंतर हवेत गोळीबार केल्याची घटना मुंबईत घडली होती. याचीच पुनरावृत्ती नाशिकमध्ये झाली आहे. नाशिकमधील देवळाली गाव परिसरात शिवसेनेच्या दोन्ही गटातील शिवसैनिकांमध्ये वाद झाला आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक सूर्यकुमार लवटे यांचा मुलगा स्वप्नील लवटे याने गोळीबार केल्याची तक्रार करण्यात आलीये.

नाशिकमध्ये गोळीबार : शिंदे गट-ठाकरे गटात वाद का झाला?

झालं असं की देवळाली गाव येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत समितीच्या अध्यक्ष पदावरून शिंदे गट आणि ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये वाद झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गोळीबार केल्याच्या आरोपावर सदा सरवणकर यांचा खुलासा; शिवसेनेवरच केला आरोप

दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर वाद विकोपाला गेला. दोन्ही गटात राडा सुरू झाल्यानंतर शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सूर्यकुमार लवटे यांचा मुलगा स्वप्नील लवटे याने बंदूक काढून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

ADVERTISEMENT

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे सह पोलिस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी गोळीबार प्रकरणी संशयित स्वप्नील लवटे याला ताब्यात घेतलं आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

नाशिक : प्रेम प्रकरणातून तरुणाला जिवंत पेटवलं; मुलीसह आईवडील, भाऊ पोलिसांच्या ताब्यात

सदा सरवणकर यांच्यावरही गोळीबार प्रकरणात गुन्हा

गेल्यावर्षी शिंदे गटाचे मुंबईतील आमदार सदा सरवणकर यांच्यावरही गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला. हा वाद पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिथे गोळी झाडली गेली होती. ही गोळी आमदार सदा सरवणकर यांनी झाडल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT